शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विद्यापीठाचा बृहत आराखडा त्रुटींच्या दुरुस्तीनंतरच शासनाकडे होणार सादर

By गणेश वासनिक | Updated: July 24, 2023 19:58 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा सन २०२३-२०२४ आणि २०२४ ते २०२९ असा सहा वर्षांसाठी बृहत आराखडा तयार केला जात आहे.

अमरावती: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा सन २०२३-२०२४ आणि २०२४ ते २०२९ असा सहा वर्षांसाठी बृहत आराखडा तयार केला जात आहे. मात्र, या बृहत आराखड्यात प्रचंड त्रुटी, चुका आणि उणिवा असल्याचा ठपका ठेवत अधिसभा सदस्यांनी सोमवारी विद्यापीठ प्रशासनाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. मात्र, बृहत आराखड्यासाठी ३१ जुलै ही डेडलाईन असल्यामुळे या प्रस्तावात असलेल्या चुका, त्रुटी दुरुस्ती करूनच तो शासनाकडे सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कुलगुरू डॉ. प्रमादे येवले यांच्या अध्यक्षतेत प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांच्या उपस्थितीत सोमवारी सिनेटची सभा बृहत आराखड्याला मंजुरी देण्यासाठी पार पडली. मात्र, शासनाकडे सादर होणाऱ्या बृहत आराखड्याच्ता प्रस्तावात प्रचंड त्रुटी, चुका असल्याची बाब डॉ. सुभाष गवई, डॉ. नीलेश गावंडे, डॉ. संतोष बनसोड, प्रताप अभ्यंकर, डॉ. प्रवीण रघुवंशी, डॉ. रवींद्र मुंद्रे, कैलास चव्हाण, डॉ. आर.डी. सिकची आदी सिनेट सदस्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली.

दरम्यान अधिष्ठाता मंडळ, विद्या परिषद आणि व्यवस्थापन परिषदेने मंजूर केल्यानंतर बृहत आराखड्यात त्रुटी, चुका राहत असतील तर ही गंभीर बाब असल्याचे डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिली. डॉ. संतोष बनसोड यांनी १३० पानाच्या या बृहत आराखड्यात १०० पेक्षा जास्त चुका असल्याचा गंभीर मुद्दा त्यांनी निदर्शनास आणला. चर्चेदरम्यान सिनेट सदस्यांनी प्रशासनाच्या कार्यप्रणालीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर यांनी चुका झाल्याबाबत दिलगिरी व्यक्त केली. तर कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी शैक्षणिक, सामाजिक गुणवत्ता साबूत ठेवण्यासाठी बृहत आराखड्यात त्रुटी, चुकांची दुरुस्ती करून तो शासनाकडे सुधारीत पाठविला जाईल, असा निर्णय घेतला. बृहत आराखडा त्रुटींच्या दुरुस्तीसाठी समिती गठितसोमवारी सिनेट सभागृहात बृहत आराखड्यात असलेल्या त्रुटी, चुकांची दुरुस्ती करण्यासाठी सहा सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. अध्यक्षपदी डॉ. सुभाष गवई तर सदस्य म्हणून डॉ. नीलेश गावंडे, डॉ. संताेष बनसोड, डॉ. रवींद्र मुंद्रे, कैलास चव्हाण, श्रीकांत काळीकर यांचा समावेश आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती