शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

‘त्या’चारही भक्तांवर सामूहिक अंत्यसंस्कार

By admin | Updated: May 9, 2017 00:01 IST

केदारनाथ यात्रेदरम्यान झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या अमरावतीच्या चारही भाविकांवर सोमवारी शोकाकुल वातावरणात ..

आप्तांना शोक अनिवार : अश्रूंचे पाट आणि हुंदक्यांचा कल्लोळ लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केदारनाथ यात्रेदरम्यान झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या अमरावतीच्या चारही भाविकांवर सोमवारी शोकाकुल वातावरणात स्थानिक हिंदू स्मशानभूमीत सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी स्मशानभूमीत चारही मृतांच्या नातलगांसह आप्तेष्टांची व शेजाऱ्यांची गर्दी उसळली होती. मृतांच्या नातलगांच्या आक्रोशाने बघ्यांचेही अश्रू आवरत नव्हते. शनिवारी दुपारी केदारनाथकडे जाताना वाहन दरीत कोसळून अमरावतीचे चार भाविक मृत्युमुखी पडले. त्यांच्या निधनाचे वृत्त सायंकाळपर्यंत अमरावतीत येऊन धडकताच सगळीकडे खळबळ उडाली होती. रविवारी उशिरा रात्री चौघांचेही मृतदेह दोन खासगी विमानांनी नागपूरला आणण्यात आले. अमरावतीला आणल्यानंतर हे मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले. पहाटे चारही मृतदेहांना त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. नातलगांच्या अंत्यदर्शनानंतर सामूहिक अंत्ययात्रा स्थानिक हिंदू स्मशानभूमीत पोहोचली. येथे चौघांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. तिघांवर अग्निसंस्कार तर मृत संजय पाटील यांच्या पार्थिवावर विद्युत वाहिनीत अंत्यसंस्कार पार पडले. सकाळी ११.३० वाजता मीना मुरादे, कुंदा काळकर, चंद्रकांत काळकर आणि संजय पाटील यांची अंत्ययात्रा हिंदू स्मशानभूमीत पोहोचली. काळकर दाम्पत्याच्या पार्थिवाला मुलगा स्वप्निल याने भडाग्नी दिला. परदेशी असलेली त्यांची कन्या सपना व जावई देखील यावेळी उपस्थित होते. पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त अभियंता चंद्रकांत काळकर हे वर्षभरापूर्वीच सेवानिवृत्त झाले होते. त्यांना एक्सटेन्शन देण्यात आले होते. एकाच वेळी दोन अंत्ययात्रा निघाल्याने काळकर कुटुंबाचा आक्रोश हृदय हेलावणारा होता. देहरादून, दिल्लीत उपचारअमरावती : रेखा कॉलनीतील रहिवासी संजय पाटील हे नांदगाव खंडेश्वर येथे मंडळ कृषी अधिकारी म्हणून कार्यरत होते. या अपघातात त्यांच्या अर्धांगिनी पौर्णिमा पाटील या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर देहरादून येथे उपचार सुरू असून त्यांची मुलगी आईजवळच थांबली आहे. मुलगा अंत्यसंस्कारासाठी अमरावतीला पोहोचला होता. सार्वजनिक बांधकाम विभागातील गुणवत्ता नियंत्रण विभागातील अधीक्षक अभियंता सुधाकर मुरादे व मीना मुरादे देखील बद्रिनाथ-केदारनाथ यात्रेला गेले होते. मात्र, भयंकर अपघातात मीना मुरादे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर सुधाकर मुरादे हे जखमी झाले आहेत. त्यांना देहरादून येथील हिमालय हॉस्पिटलमधून दिल्ली येथील अपोलो रूग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. मीना मुरादे यांच्या पार्थिवावर त्यांचा मुलगा सर्वेशने अंत्यसंस्कार केले. सर्वेश हा पीडीएमसीमध्ये एमबीबीएसचा विद्यार्थी आहे. एमटेक झालेली मुलगी आंचल हीदेखील आईच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होती. सामूहिक अंत्यसंस्काराच्यावेळी आ. वीरेंद्र जगताप, आ.सुनील देशमुख, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, कृषी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह सामाजिक व राजकीय क्षेत्रातील गणमान्य उपस्थित होते. जन्म, लग्न, मृत्यू एकाच दिवशी !मीना मुरादे यांच्यासोबत काळाने विचित्र खेळ केलाय. मीनातार्इंचा जन्म, लग्न आणि मृत्यू एकाच तारखेला घडवून काळाने आपण सर्वव्यापी, सर्वाधिकारी असल्याचे सिद्ध केलेय. मीनातार्इंचा वाढदिवस ६ मे, लग्नाची तारीख ६ मे आणि मृत्यू देखील ६ मे रोजीच. अपघातापूर्वी अनेक नातलगांनी दिलेल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारून लगेच मीनातार्इंचा अज्ञाताचा प्रवास सुरू झाला. दैवाची ही विचित्र खेळी त्यांच्या नातलगांच्या जिव्हारी लागली आहे. परदेशी जाणार होते काळकर दाम्पत्यपरदेशात मागील सहा वर्षांपासून स्थायिक असलेल्या काळकर दाम्पत्याला त्यांच्या मुलीच्या भेटीची अनिवार ओढ लागली होती. त्यासाठी त्यांची जय्यत तयारीही झाली होती. तिकिटे देखील काढून झाली होती. ३० मे रोजी ते परदेशी रवाना होणार होते. शेजाऱ्यांच्या आग्रहास्तव त्यांनी केलेली तीर्थयात्रा त्यांची मरणयात्रा ठरली आणि मुलीलाच त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित रहावे लागले.