शहरं
Join us  
Trending Stories
1
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
2
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
3
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
4
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
5
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
6
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
7
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
8
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
9
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
10
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
11
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
12
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
13
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
14
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
15
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
16
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
17
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
18
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
19
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
20
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?

मेळघाटात व्यापक जनजागृती होणे गरजेचे

By admin | Updated: November 7, 2016 00:24 IST

मेळघाटमधील अतिदुर्गम भागात खडीमल या गावात नरबळीच्या उद्देशाने स्वत:च्या निष्पाप दोन बालकांचा जीव घेण्याच्या ...

नरबळी प्रकरण : अंधश्रद्धा निर्मूलन समितीची खडीमलला भेटचिखलदरा : मेळघाटमधील अतिदुर्गम भागात खडीमल या गावात नरबळीच्या उद्देशाने स्वत:च्या निष्पाप दोन बालकांचा जीव घेण्याच्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमिवर अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दोन वेळा या गावात भेट देऊन पोलीस प्रशासन, गावकरी, पीडित कुटुंबांची भेट घेतली. या घटनेमागील वस्तुस्थिती काय असावी, हे जाणून घेण्याचा प्रयत्न अंनिसने केला आहे. पारंपरिक पूजा करण्याचा, त्यासाठी कोंबड्या-बकऱ्यांचा बळी देण्याची प्रथा मेळघाटात आहे. पण अंधश्रद्धेपोटी मानवी बळी देण्याचा घडलेला हा प्रसंग अतिशय दुर्दैवी आहे. कुटुंबाशी व गावकऱ्यांशी बोलण्यातून असे पुढे आले की गावात शेती हंगाम संपल्यावर स्थानिक पातळीवर कुठलेही काम उपलब्ध होत नसल्याने व पाण्याची टंचाई निर्माण होत असल्याने बहुतेक कुटुंब हाताला काम मिळवण्यासाठी गाव सोडून बाहेर पडतात. काही वर्षांअगोदर सुधाकर सावलकरचे संपूर्ण कुटुंब व काही गावकरी रस्ता बांधणीच्या कामासाठी ठेकेदारांकडे गेले होते. यादरम्यान या कामावरून दुसरीकडे मजूर नेत असताना त्या वाहनाचा अपघात झाला. त्यातील बहुतेक मजूर मृत पावले. पण सुधाकर व त्याचे संपूर्ण कुटुंब त्यातून बचावले व वेळेस देवीच्या कृपेने तुम्ही वाचले, असे तेथे उपस्थितांपैकी कोणीतरी सुधाकरला म्हटले व तेव्हापासून सुधाकर देवीची भक्ती करू लागला. यातूनच तो कधीकधी देवी स्वप्नात आली, देवीने मला आदेश दिला, असे तो गावातील लोकांना सांगत होता. निर्व्यसनी असलेला सुधाकर लोकांपासून दूर राहून नेहमी आपल्या शेती व कुटुंबात रमलेला असायचा. ऐन दिवाळीच्या दिवशी या क्रूरकर्म्याने स्वत:च्या पोटच्या गोळ्यावर कुऱ्हाडीचे सपासप वार करून आपल्या पूजेची सांगता केली. अंधश्रद्धा किती घातक असू शकते आणि अंधश्रद्धाळू माणूस किती टोकाची भूमिका घेऊ शकते, हे खडीमल गावातील या भयानक प्रकरणातून पुढे आले आहे. एवढी क्रूर घटना घडूनदेखील शासनाचा कुठल्याही प्रतिनिधीने अजूनपर्यंत भेट दिली नाही. आदिवासी विभागाचे १२ जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या जिल्ह्यात आदिवासी कुटुंबात ही घटना घडूनही कोठल्याच अधिकाऱ्याने भेट दिली नाही. यासाठी नेमलेल्या सत्यशोधन समितीत कार्याध्यक्ष अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उमेश चौबे, महासचिव हरीश देशमुख, जिल्हा संघटक शेखर पाटील, जिल्हा सचिव हरीश केदार, उत्तम सुळके, अशोक खुजनारे, मंगेश खेरडे यांचा समावेश होता. ही सर्व मोहीम अ‍ॅड. गणेश हलकारे यांच्या मार्गदर्शनात पार पडली. (तालुका प्रतिनिधी)