अमरावती ; कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे बंद असलेले मंग़ल कार्यालय,लॉन,हॉल आणि खुल्या जागेच्या आसन क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीत परवानगी द्यावी अशी मागणी संघर्ष कृती समितीने जिल्हाधिकारी यांचे मार्फत शासनाकडे निवेदनाव्दारे केली आहे.
समितीच्या प्रमुख मागण्यामध्ये सर्व प्रकारच्या कार्यक्रमात मंडप,लॉन,मंगल कार्यालय हॉलच्या क्षमतेपेक्षा ५० लोकांच्या उपस्थितीस परवानगी द्यावी,टेन्ट,मंडप,मंगल कार्यालय,बॅक्वेट हॉल,लाॅन्स,इव्हेन्ट मॅनेजमेंट,साऊंट,लाईटींग,डेकोरेशन आणि इतर या व्यावसायाशी संबंधित जीएसटी १८ टक्याऐवजी ५ टक्के पर्यत करावा,या क्षेत्रातील अनेक व्यावसायीकांनी साहीत्य ठेवण्यासाठी भाडयाने हाॅल,गोदाम,मंग़ल कार्यालय भाडयाने घेतले आहेत.तेव्हा परिस्थिती सामन्य होईपर्यत शासनाने भाडे द्यावे अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.निवेदन देतेवेळी कृती समितीचे विनोद डागा,टॉप लिओ,अभिजित लोखंडे,जितू बघेल,गणेश कलाणे,राजेश वाडेकर,पवण आसोपा,संजय साहू,गिरीष शर्मा,चेतन फुटाणे,शरद पोटफोडे,सचिन राऊत,विजय ढगे,दिलीप सरदार,मोहन मिश्रा,संतोष मानकर,सतिश जयस्वाल आदी उपस्थित होते.