अमरावती : सासरच्या मंडळीने पैशांच्या हवासापोटी शारीरिक व मानसिक त्रास देऊन विवाहितेच्या अंगावर रॉकेल टाकून पेटविल्याची घटना गुरुवारी नवसारी परिसरातील सिध्दार्थ नगरात घडली. तक्रारीनुसार, सासरची मंडळी पैशांची मागणी करून तिला शारीरिक व मानसिक त्रास देत होते. आरोपी पती पंकज खरबडकर, सासरे साहेब खरबडकर, सासू बेबी खरबडकर, गजानन खरबडकर, अंकुश खरबडकर, सिमा खरबडकर व उमा खरबडकर यांनी संगनमताने अंगावर रॉकेल टाकून पेटविले, असा आरोप पीडिताने केला आहे. महिलेला गंभीर अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. जखमी महिलेचे गाडगेनगर पोलिसांनी बयाण नोंदविले असून सासरच्या मंडळीवर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुध्द भादंविच्या कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
रॉकेल टाकून विवाहितेला पेटविले
By admin | Updated: October 17, 2015 00:23 IST