लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडिया (सीसीआय) ची अभिकर्ता म्हणून राज्य सहकारी पणन महासंघाद्वारा २५ आॅक्टोबरपासून जिल्ह्यातील पाच केंद्रांवर कापसाची खरेदी करण्यात येणार आहे. दोन केंद्रांवर सीसीआय खरेदी करणार आहे. दरम्यान, सोमवारी यासंदर्भात सीसीआयसोबत पणन महासंघाचा करार झाला आहे.जिल्ह्यातील अमरावती, दर्यापूर, वरूड, तिवसा व अचलपूर या केंद्रांवर पणन महासंघ बुधवारपासून कापसाची खरेदी करणार आहे. चांदूर रेल्वे व धामणगाव केंद्रांवर सीसीआयद्वारा खरेदी होणार आहे. मात्र, ही केंद्र कधी सुरू होणार, याबाबत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, कापसाच्या वाणानुसार हमीभाव निश्चित करण्यात आलेला आहे. यामध्ये बन्नी व ब्रह्म या जातीला ४ हजार २२० रुपये प्रति क्विंटल, तर एच ४, एच ६ ला ४ हजार २२० व एलआरए ५१६६ या जातीला ४ हजार १२० रुपये हमीभाव राहणार आहे.यंदाच्या हंगामात पेरणीपासून पावसाची तूट असल्यामुळे कपाशीची पेरणी उशिरा झाली.नंतरही पावसाचा ताण असल्याने पिकाची वाढ खुंटली होती. आॅनलाइन नोंदणी कापसाच्या विक्रीपूर्व शेतकºयांना बाजार समित्यांमध्ये आॅनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी सातबारा उतारा, बँक खाते क्रमांक व आधार क्रमांक द्यावा लागणार आहे. त्याशिवाय शेतकºयांच्या कापसाची खरेदी होणार नाही. यापूर्वी शेतकºयांना केवळ सातबारा द्यावा लागत होता. परंतु, आता आॅनलाइन नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. दरम्यान, रसशोषक किडी, लाल्या व गुलाबी बोंडअळींनी हल्ला चढविला. यामुळे कपाशीच्या उत्पादनात सरासरी ३० ते ४० टक्क्यांनी घट येणार आहे. दिवाळीपूर्व कापसाची वेचणीच झालेली नाही. आता बोंडे फुटायला सुरुवात झाली, तर अवकाळीने कापूस ओला झाला आहे. ज्या शेतकºयांनी धूळपेरणी केली होती, त्या शेतकºयांचाच कापूस वेचणीला सुरुवात झालेली आहे. सद्यस्थितीत प्रतवारीनुसार कापसाला चार ते साडेचार हजार रुपये क्विंटल असा भाव खुल्या बाजारात मिळत आहे.यंदा कापसाच्या भाववाढीची शक्यताअनेक कापूस उत्पादक देशांमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे विदेशात कापसाच्या गाठी निर्यातीला मोठी संधी असल्याने पिकाला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात कापसाच्या वेचण्या सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे पणन महासंघाची केंद्रे सुरू झाल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला असला तरी खरेदीसाठी मात्र प्रतीक्षाच करावी लागणार आहे.सीसीआयसोबत सोमवारी पणन महासंघाचा करारनामा होत आहे. राज्यात ६० केंद्रांवर खरेदीची परवानगी मिळाली आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात पाच केंद्रांवर बुधवारपासून कापूस खरेदी करण्यात येईल.- छाया दंडाळेसंचालक, पणन महासंघ, मुंबई
पणन महासंघाची कापूस खरेदी बुधवारपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 22:43 IST
कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडिया (सीसीआय) ची अभिकर्ता म्हणून राज्य सहकारी पणन महासंघाद्वारा २५ आॅक्टोबरपासून जिल्ह्यातील पाच केंद्रांवर कापसाची खरेदी करण्यात येणार आहे.
पणन महासंघाची कापूस खरेदी बुधवारपासून
ठळक मुद्देमुहूर्त सापडला : सीसीआयची दोन खरेदी केंदे्र