स्वस्त दरात मिळणार कापड : रेडिमेडची कारखानदारी वाढणारमनीष कहाते अमरावतीअमरावतीनजीकच्या नांदगाव पेठ येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत ७०० हेक्टर जमीन टेक्सटाईल पार्ककरिता आरक्षित आहे. त्या ठिकाणी काही उद्योग सुरू झाले आहेत. भविष्यात मोठ्या प्रमाणात कापडाशी संबंधित उद्योग सुरू होणार असल्याने अमरावतीच्या बाजारपेठेला फार महत्त्व येणार आहे. टेक्सटाईल पार्कमध्ये औद्योगिकरणाची वाढ झाल्यानंतर रेडिमेडच्या कारखानदारी सुरू होऊन येथील व्यापाऱ्यांना देशाच्या कानाकोपऱ्यात रेडिमेडचा माल खरेदी करण्याकरिता जावे लागणार नाही. अमरावतीतच धागा आणि अमरावतीतच तयार रेडिमेड कापड मिळणार असल्याने ग्राहकांना त्याचा फायदा मोठ्या प्रमाणावर होणार आहे. सध्या शहरात तयार रेडिमेड कापडाचे २०० ते २५० किरकोळ दुकाने आहेत. येथील रेडिमेडचे दुकानदार दिल्ली, कलकत्ता, लुधियाना, इंदूर, मुंबई, जबलपूर इत्यादी ठिकाणाहून रेडिमेडचा तयार माल शहरात विक्रीकरिता येतो. त्यामुळे दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय लांब अंतर असल्याने माल अमरावतीत आणण्याचे भाडे अधिक लागतात आणि त्याचा अप्रत्यक्ष भुर्दंड ग्राहकांच्या खिशाला बसतो. त्यामुळे रेडिमेड कापड १० ते २० टक्क्याने महाग पडतो. तेच कापड टेक्सटाईल पार्कमध्ये तयार झाल्यास ग्राहकांना स्वस्त दरात विकता येत असल्याचा व्यापाऱ्यांचा दावा आहे. सध्या अमरावतीच्या रेडिमेडच्या बाजारपेठेत कॉटनच्या कापडाला सर्वाधिक मागणी आहे. कॉटनचे शर्ट प्रामुख्याने इंदौरला तयार होते. जिन्सचे पॅन्ट मुंबई, उल्हासनगर येथे तयार होतात. लहान मुलांचे तयार कपडे दिल्ली आणि कलकत्ता येथे तयार होतात. आजकाल मोदी जॅकेटला बाजारपेठेत प्रचंड मागणी आहे.अमरावतीच्या बाजारपेठेत रेडिमेड कापडाचे दुकाने जवाहर रोड, जयस्तंभ चौक, राजकमल चौक, बडनेरा रोड, मोतीनगर, गाडगेनगर, बडनेरा शहर इत्यादी ठिकाणी आहेत.टेक्सटाईल पार्कमध्ये उद्योग सुरू झाल्यास त्याचा फायदा सामान्य ग्राहकांना होणार आहे. बाजारपेठेत रेडिमेडचा स्टॉक भरपूर आहे.- महेश पिंजानी,रेडिमेड दुकानदार, अमरावती.
टेक्सटाईल पार्कमुळे वधारणार बाजारपेठ
By admin | Updated: May 17, 2015 00:50 IST