शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

२५ लाखांसाठी विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:12 IST

तळेगाव दशासर : घरबांधणीसाठी माहेरहून २५ लाख रुपये आणण्याचा तगादा लावत एका विवाहितेला मारहाण करण्यात आली. १५ ऑगस्टपूर्वी ...

तळेगाव दशासर : घरबांधणीसाठी माहेरहून २५ लाख रुपये आणण्याचा तगादा लावत एका विवाहितेला मारहाण करण्यात आली. १५ ऑगस्टपूर्वी ही घटना घडली. याप्रकरणी तळेगाव दशासर पोलिसांनी आरोपी अनिकेत धाबेकर, गणेश धाबेकर व दोन महिला (सर्व रा. नागपूर) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

------

ते बोगस बियाणे २९ हजारांचे

चांदूररेल्वे : तालुक्यातील मांजरखेड कसबा येथून जप्त करण्यात आलेल्या बोगस बी बियाणे सुमारे २९ हजार १४६ रुपये किमतीचे असल्याची तक्रार प्रकाश खोबरखेडे यांनी केली आहे. २३ मे रोजी दुपारी ही कारवाई करण्यात आली होती. याप्रकरणात दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

--------------

भिल्ली येथे भावंडांना मारहाण

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील भिल्ली येथे प्रमोद खंडाते व प्रकाश खंडाते यांना मारहाण करण्यात आली. वाहनाला कट का मारला, अशी विचारणा केल्याने २३ मे रोजी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी दत्तापूर पोलिसांनी आरोपी जगदीश काळमेघ, अमर काळमेघ, आकाश काळमेघ, अजय काळमेघ यांचे विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याच प्रकरणात अजय काळमेघ यांच्या तक्रारीवरून खंडाते बंधुविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

----------------

हिंगणगाव येथे सुरक्षारक्षकाला मारहाण

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील हिंगणगाव कोविड सेंटरमध्ये खाजगी सुरक्षारक्षक असलेल्या एका ४२ वर्षीय इसमाच्या मांडीवर चाकूने वार करण्यात आला. २३ मे रोजी ही घटना घडली. याप्रकरणी दत्तापूर पोलिसांनी आरोपी विनोद घोडाम (३२, क्रिष्णानगर, जुना धामणगाव रेल्वे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

----------------

वरूडच्या माहेरवासीनीचा दिल्लीत छळ

वरूड : येथील एका २५ वर्षीय विवाहितेचा सासरी दिल्ली येथे शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ८ नोव्हेंबर २०१९ ते ८ डिसेंबर २०२० दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी वरूड पोलिसांनी तनवीर अन्सारी शेख मोबीन, उबेद अन्सारी व दोन महिलांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

-------------

वन्यप्राण्यांमुळे शेतकरी असुरक्षित

वरूड : तालुक्याला लागून मोठे जंगलक्षेत्र असल्याने जंगली जनावरांचा त्रास वाढला आहे. शेतकऱ्यांची रात्र शेतातच जात आहे. २४ तास पिकाची रखवाली करण्याशिवाय शेतकऱ्यांजवळ पर्याय उरलेला नाही. शेतकरी रात्री शेतात राहून ओलित करतात. मात्र वन्यप्राण्यांच्या वाढत्या हैदोस शेतकरीमारक ठरला आहे.

-------------------

विवाह समारंभात १५ लोकांची अट शिथिल करा

अमरावती : जिल्हा प्रशासनाने विवाह समारंभाकरिता केवळ १५ जणांना परवानगी देण्यात आली आहे. १५ लोकांमध्ये विवाह कसा करावा, असा यक्षप्रश्न वधुपित्यासमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे अनलॉक करताना १५ लोकांची अट शिथिल करावी, अशी आग्रही मागणी समोर आली आहे.

-----------

मास्क नसतानाही अनेक दुकानांत प्रवेश

अमरावती : येथील अनेक आस्थापना, कार्यालयात, बँकांमध्ये कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी मास्कशिवाय प्रवेश नसल्याचे फलक लावण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात ना लोक मास्क घालून प्रवेश करीत, ना विनामास्क प्रवेश करणाऱ्याला कुणी अटकाव घालत. हॅन्ड सॅनिटायझर,फिजिकल डिस्टन्सिंग तर केव्हाचेच बाद झाले आहे. कुठेही हॅन्ड सॅनिटायझर ठेवलेले दिसत नाही.

--------------

ग्राहकांचे व्हॉत्सअ‍ॅप ग्रुपवर टाका रेशनची माहिती

अमरावती : जिल्हाधिकारी शेैलेश नवाल यांनी १४ मे रोजी लॉकडाऊनसंदर्भात नवीन आदेश काढले आहेत. त्यात रेशन दुकानेही सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत सुरू राहतील. त्यासाठी तहसीलदार व स्वस्त धान्य दुकानदारांनी लाभार्थ्यांचे व्हाट्सॲप ग्रुप तयार करून टोकन सिस्टीमचा अवलंब करण्याविषयी निर्देश आहेत. गर्दी होऊ नये, म्हणून ही खरबरदारी घेणे बंधनकारक आहे.

-----------

जिल्ह्यात यायचे, आरटीपीसीआर बंधनकारक

अमरावती : लॉकडाऊनच्या काळात परराज्यातून कोणतेही वाहन आल्यास त्यातील व्यक्तीकडे आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट आवश्यक आहे. राज्य सीमावर्ती परिसरात मोर्शी, अचलपूर, धारणी एसडीओंनी तसे तपासणी नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

------------

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्ययन केंद्र हवे

अमरावती : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारधारा (अध्यायन) केंद्र तात्काळ सुरू करण्याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा व विद्यापीठात तुकडोजी महाराज विचारावर आधारित शॉर्ट टर्म कोर्सेस तात्काळ सुरू करण्याची मागणी राज्यपाल नामित सिनेट सदस्य मनीष गवई यांनी कुलगुरूंना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

--------------

पेरणी हंगाम जवळ असल्याने कामांना गती

अमरावती : कोरोना साथीमुळे शासकीय कार्यालयांत उपस्थितांच्या संख्येवर मर्यादा असल्या तरी अत्यावश्यक सेवा पुरविणारी कार्यालये सुरू आहेत. कृषी कार्यालयांकडून आवश्यक तिथे प्रत्यक्ष हजर राहून व शक्य तिथे ऑनलाईन कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. पेरणी हंगाम जवळ असल्यामुळे कामांना गती देण्यात आली आहे. ही कामे करताना कोविड प्रतिबंधक दक्षतेचे पालन करण्यात येत आहे, अशी माहिती कृषी कार्यालयातर्फे देण्यात आली.

-------------

फोटो पी २५ शिरखेड

डीबी बंद, शेतकऱ्यांना नुकसान

शिरखेड : मोर्शी तालुक्यातील नया वाठोडा येथील इंगळे यांच्या शेतातील डीबी १५ दिवसांपासून सतत बंद असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. याकडे संबंधित अधिकारी, कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याने शेतकरी फारच त्रस्त झाला आहे.

------------

फोटो पी २५ कोरोना शिरखेड

नया वाठोडा येथे कोविड लसीकरण

शिरखेड : मोर्शी तालुक्यातील नया वाठोडा ग्रामपंचायत येथे २४ मे रोजी तालुका वैद्यकीय अधिकारी महेश जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात व नेरपिंगळाई आरोग्य केंद्रांतर्गत लसीकरणाचे आयोजन केले होते. एकूण ६६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. लसीकरणाबाबत ग्रामीण भागात जनजागृतीदेखील करण्यात आली.

--------

निकृष्ट दर्जाच्या १९ सोयाबीन बॅगची रक्कम परत

अमरावती : जावरा येथील शेतकरी रमेश भोरे यांना निकृष्ट दर्जाच्या १९ सोयाबीन बॅगची रोख रक्कम जि. प. उपाध्यक्ष विट्ठल चव्हाण, कृषी समितीचे सदस्य प्रकाश साबळे, कृषी अधिकारी उज्ज्वल आगरकर यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आली. तब्बल ७ महिन्यांच्या अवधीनंतर प्रकाश साबळे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे ते शक्य झाले.

------------