शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मराठ्यांचा आज उसळणार सागर

By admin | Updated: September 22, 2016 00:09 IST

गुरुवार २२ सप्टेंबर ....सकाळी ११ वाजता ...स्थळ -नेहरु मैदान ते गर्ल्स हायस्कुल चौक...मराठ्यांच्या मुक मोर्चाची उत्सुकता अक्षरश: शिगेला पोहोचली आहे.

अमरावती : गुरुवार २२ सप्टेंबर ....सकाळी ११ वाजता ...स्थळ -नेहरु मैदान ते गर्ल्स हायस्कुल चौक...मराठ्यांच्या मुक मोर्चाची उत्सुकता अक्षरश: शिगेला पोहोचली आहे. अमरावतीचा मोर्चा रेकॉर्डब्रेक होईल,याबद्दल कुणाच्याही मनात शंका नाही.मागील ४ तारखेपासून सुरु असलेल्या नियोजनाची फत्ते होण्याची वेळ येऊन ठेपली आहे. दहा लाख मराठे मुकमोर्चाने कोपर्डी प्रकरणाचा निषेध करतील आणि पाठोपाठ आरक्षणाची मागणी बुलंद केली जाईल. ही बुलंदी मौन असेल. गुरुवारी सकाळपासूनच शहरातील विविध रस्ते मराठ्यांंनी गजबजतील. नागपुरनंतर विदर्भातील सर्वात मोठे शहर आणि मराठ्यांची सर्वाधिक लोकसंख्या पाहता अमरावतीच्या मोर्चाकडे संपूर्ण विदर्भाचे लक्ष केंद्रीत झाले आहे. संपूर्ण शहर मोर्चाच्या पूर्वसंध्येलाच मराठामय झाले आहे. ‘मूकमोर्चा तरीही पेटतो महाराष्ट्र’, ‘खबरदार ! जर छेडाल जिजाऊंच्या लेकींना’, ‘मी जातोय, तुम्ही पण या’, अशा फ्लेक्स -बॅनरने तमाम मराठ्यांना मोर्चात सहभागी होण्याचे आगळे निमंत्रण खुणावत आहे. मुख्य मार्गावरील वाहतूक राहणार बंद मोर्चामुळे वाहतुक कोंडी निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता शहरातील मुख्य मार्गावरील वाहतूक करण्यात येणार आहे. बडनेरा येथून गोपालनगर टी-पॉर्इंटकडून शहरात येणाऱ्या सर्व जड व हलक्या वाहनांना प्रवेशबंदी असणार आहे. या वाहनाना बडनेरामार्गे बियाणी चौक, वेलकम पॉर्इंट, रहाटगाव रिगंरोड, कठोरा नाका, राजपुत ढाबा मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. वलगावकडून कठोरा नाकामार्गेही प्रवेश बंदी लागू राहणार असून या मार्गाने वाहतूक करणाऱ्या एसटीबसेसला वेलकम टी-पॉर्इंट, बियाणी चौक, चपराशीपुरा मार्गे बसस्थानकापर्यंत येता येणार आहे. भातकुली व लालखडीकडून येणाऱ्या एसटी बसेस नागपूरी गेट चौकातून डावे वळण घेऊन नवसारी रिंगरोड, कठोरा जकात नाका, रहाटगाव रिंगरोड, वेलकम टी-पॉर्इंट, बियाणी चौक, चपराशी पुरामार्गे बसस्थानकाकडे येतील, इतर हलके व जड वाहनाना सुध्दा नागपुरी गेटकडून शहरात येता येणार नाही. राजापेठ ते राजकमल चौक ते मालवीय चौक व चित्रा चौक ते मालविय चौक ते कोर्ट चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे. या मार्गाने वाहतूक करणाऱ्यांना गांधी चौक, टांगापडाव चौक, चित्रा चौक, दिपक चौक, चौधरी चौक, विलास नगर चौक ते बाबा कार्नर या मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. रेल्वे स्थानक चौक ते राजकमल चौक, जयस्तंभ चौक, राजापेठ ते राजकमल चौक मार्गे मालवीय चौक, चित्रा चौक ते कोर्ट चौक तसेच उड्डानपुलाखाली व या मार्गावर असलेल्या सर्व दुकानासमोर व इतर अंतर्गत मार्गावर कोणतेही वाहन उभे राहणार नाही.शासकीय कर्मचाऱ्यांनी घेतली मोर्चासाठी सुटीमराठा क्रांती मूकमोर्चा गुरूवारी निघणार असल्याने यात जिल्हाभरातील लाखो मराठे सहभागी होत आहेत. मात्र, पहिल्यांदाच मराठा क्रांती मूकमोर्चा अमरावतीत निघत असल्याने या मोर्चात अनेक मराठे सहभागी होणार आहेत. नेमकी यादिवशी सुटी नसल्याने मोर्चात सभागी होण्यासाठी शासकीय सेवेत काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांनी सुटीचे अर्ज आपल्या खातेप्रमुखांकडे दिले आहेत. मोर्चातील सहभागात कुठलेही कामाचे टेन्शन नसावे, यासाठी अनेक शासकीय कार्यालयातील मोर्चात सहभागी होण्यासाठी रितसर अर्ज करून सुटया घेतल्या आहेत.तालुकानिहाय पार्किंग स्थळ तालुक्यातून शहराकडे येणाऱ्या नागरिकांसाठी तालुकानिहाय पार्किंगस्थळ नांदगाव खंडेश्वर- राजापेठ बसस्थानक, राजापेठ चौक. बडनेरा शहर - दसरा मैदान. भातकुली- धर्मदाय कॉटन फंड, वॉलकट कंपाऊंड. धामणगाव रेल्वे- आशीर्वाद मंगल कार्यालय, टोपेनगर. चांदूररेल्वे- आशीर्वाद मंगल कार्यालय, टोपेनगर.मराठा क्रांती मूक मोर्चा : अशी आहेत वैशिष्ट्ये मोर्चामध्ये साडेसात ते आठ लाख समाजबांधव येणाची शक्यता मोर्चासाठी जिल्ह्याभरातून ४६० ट्रॅक्टर्स, ३२५ मिनी ट्रक, २०० खासगी बसेस, २२ हजार जीप व कार, ५० हजार दुचाकींची नोंदणी-महाविद्यालयीन विद्यार्थी , डॉक्टर्स, वकील ही मंडळी ड्रेसकोडमध्ये येणारमोर्चाकरिता ३५०० स्वयंसेवकाची फळी पेयजलाचे १५० स्टॉल्स ,वैद्यकीय प्रथमोपचाराचे २० दालने मोर्चामार्गामध्ये २५ रुग्णवाहीका मोर्चाच्या अग्रभागी पारंपारिक वेशभूषेतील विद्यार्थी, तरूणी, महीला, वकील, डॉक्टर्स, तरुण, ज्येष्ठ मंडळी, सामाजिक व राजकीय संघटनांचे प्रतिनिधी असणार.मोर्चाकरिता १० हजार झेंडे व ५ हजार सूचना फलक मोर्चा संपूर्णपणे मूकमोर्चा असणार.मोर्चाची सुरूवात ११ वाजता नेहरु मैदान येथून सुरू होवून गर्ल्स हायस्कूल येथे २ वाजता समारोप मोर्चाचे ड्रोन कॅमेराद्वारे व्हिडिओ रेकॉर्डिंगमोर्चा झाल्यानंतर मोर्चामार्गाची त्वरीत स्वच्छता कार्यकर्ते करणार.मोर्चाकरिता मध्यवर्ती ध्वनीक्षेपक व व्हीडीओ यंत्रणा असणार.मोर्चाचे अत्याधुनिक पद्धतीच्या ड्रोन कॅमेराद्वारे व्हीडीओ रेकॉर्डींग.शाळा-महाविद्यालयांना मनपा प्रशासनातर्फे सुटी जाहीर महीला व पुरूष काळे परिधान वा काळ्या रिबीन बांधून निषेध व्यक्त करणार.कोपर्डीची पिडीता व उरी येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली देवून होणार मोचारचा समारोप शहरभर १३ ठिकाणी विविध तालुक्यांकरिता वाहनतळ कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने होणार.या मोर्चाकरिता इतर अनेक समाज घटकांनी पेयजल, प्रथमोपचार इत्यादी सुविधा देवून या मोर्चास पाठींबा जाहीर केलेला आहे. गाडगेबाबा समाधी समोरील प्रांगण, शिवाजी बीपीएड कॉलेज शिवाजीनगर, रुरल इन्स्टीट्यूट, विधी महाविद्यालय, जिल्हा स्टेडियममध्ये पार्किंग व्यवस्था.