लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अंगात देवीचा संचार असल्याचा आव आणणाऱ्या पवन महाराजच्या चरणाशी भोळसटपणे अनेक महिला नतमस्तक व्हायच्या. तो थोर संत-महात्मा आहे; त्याच्या चरणाशी राहिल्यानेच सर्व अपेक्षा पूर्ण होईल, ही महिलांची अंधश्रद्धाच जेमतेम विशी पार केलेल्या या भोंदूला बळ देत गेली. त्याने बोलबच्चनातून महिलांना आकर्षित केले. मात्र, अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्याचा भंडाफोड केल्यानंतर हे भक्तगणसुद्धा दिसेनासे झाले आहेत.भारतात अनेक संत-महात्मे होऊन गेले. त्यांच्या प्रबोधनातून समाजपरिवर्तन घडले. मात्र, भोंदूगिरी करणाºया तथाकथित महाराजांनी संत महात्मांची परिभाषाच बदलविली. दक्ष समाजकारण्यांनी जादूटोणा विरोधा कायद्याचा पाठपुरावा केला. यानंतर गेल्या काही वर्षांत जनतेच्या धार्र्मिक भावनांशी खेळ खेळणाºया अनेक भोंदूबाबांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काहींवर लैंगिक शोषणाचे आरोप लागले आहेत. आसाराम बापू व रामरहीम हे या मालिकेतील ताजे उदाहरण सर्वांसमोरच आहे. भोंदूगिरी करणाºया अशा महाराजांजवळ महिलांची गर्दी नेहमीच आढळून येते. महाराज आपल्या समस्येचे निरसन करेल, अशी भावना महिलांमध्ये असते. त्यांचा हेतू वाईट नसतो; मात्र भोंदूबाबा अशा वेळी त्यांना भावनीक ब्लॅकमेल करून गैरफायदा घेतात. भोंदूबाबाशी जवळीक साधणाºया महिलांना अखेर लैंगिक शोषणाला बळी पडावे लागते.तरुण वयात पवन महाराज बनलेल्या पवन घोंगडेचा भंडाफोड होण्यापूर्वी त्याच्या चरणाशी शेकडो महिलांचा जमावडा पाहायला मिळाला. पवन महाराज अनेकांच्या घरापर्यंतसुद्धा पोहोचला आहे. त्याने पूजा-अर्चेच्या आड आणखी काही भलतेच उद्योग तर चालविले नाहीत ना, अशी शंकासुद्धा सुजाण नागरिकांनी उपस्थित केली आहे.समाज माध्यमांमध्ये मुक्त वावर; पोलिसांना दिसेनापवन महाराजच्या नादी लागलेल्यांचा ‘जय भवानी’ नावाने व्हॉट्स अॅप ग्रुप आहे. त्याच्या दिनचर्येविषयी अप-टू-डेट माहितीदेखील भंडाफोड होण्यापूर्वी या ग्रुपवर टाकण्याचे काम भक्तमंडळी करीत होती. दोन दिवसांपूर्वी ग्रुपवर पवन महाराजाचे पूजा-अर्चा करतानाचे छायाचित्र एकाने अपलोड केले. तो मुंबईतील एका जणाकडे पूजा-अर्चा करीत असल्याचे ते छायाचित्र असल्याची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून मिळाली आहे. पवन महाराज व्हॉट्स अॅपवर दिसू शकतो; मग पोलिसांच्याच हाती का लागत नाही, हाही एक संशोधनाचा विषय आहे.१५ जणांचे नोंदविले बयाणभोंदूबाबा पवन महाराजच्या सान्निध्यात राहणाºया पंधरा जणांचे बयाण गाडगेनगर पोलिसांनी नोंदविले आहेत. त्यामध्ये पवन महाराजच्या विरोधात बोलणारे अधिक असल्याचे पोलिसांकडून माहिती मिळाली आहेत. अद्याप पवन महाराज पोलिसांच्या हाती लागला नसून, तो मुंबईत दडून बसला आहे. त्याचा माग काढण्यासाठी पोलिसांनी खबरे पेरले आहेत.पवन महाराजच्या आसपास असणाऱ्या नागरिकांचे बयाण नोंदविले आहे. पवन महाराजचाही कसून शोध घेतला जात आहे. त्याला लवकर गजाआड करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.- मनीष ठाकरे,पोलीस निरीक्षक, गाडगेनगर.
पवन महाराजच्या चरणाशी अनेक महिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 22:25 IST
अंगात देवीचा संचार असल्याचा आव आणणाऱ्या पवन महाराजच्या चरणाशी भोळसटपणे अनेक महिला नतमस्तक व्हायच्या. तो थोर संत-महात्मा आहे; त्याच्या चरणाशी राहिल्यानेच सर्व अपेक्षा पूर्ण होईल, ही महिलांची अंधश्रद्धाच जेमतेम विशी पार केलेल्या या भोंदूला बळ देत गेली.
पवन महाराजच्या चरणाशी अनेक महिला
ठळक मुद्देपसारच : श्रद्धेच्या बेटावर अंधश्रद्धेची विषवल्ली