शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
3
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
4
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा 'इतका' दर लावला
5
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
6
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
7
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
8
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
9
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
10
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
11
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
12
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
13
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
14
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
15
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
16
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
17
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
19
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
20
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
Daily Top 2Weekly Top 5

चाचणीविना अनेक वाहनांना मिळतात परवाने

By admin | Updated: July 8, 2016 00:14 IST

येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात दलालराज कायम आहे. सोमवारी त्यांनी आरटीओ कार्यालयात धुमाकूळ घातला.

दलालराज कायम : ड्रायव्हिंग स्कूलच्या संचालकांचे, साटेलोटेसंदीप मानकर अमरावतीयेथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात दलालराज कायम आहे. सोमवारी त्यांनी आरटीओ कार्यालयात धुमाकूळ घातला. अधिकाऱ्यांचे व ड्रायव्हींग स्कूलच्या संचालकांचे साटेलोटे असल्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांचा परवाना काढायचा असेल तर त्याची ट्रायल न होताच परवाने दिले जात आहेत. दलालांना येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अभय आहे. अतिरिक्त पैसे घेतल्याशिवाय ते काम करीत नाहीत. विविध दलालांची परवाना काढून देण्याचे वेगवेगळे रेट आहेत. नियमाने शिकाऊ परवाना दिल्यानंतर त्याला एक महिन्यात परवाना मिळतो. त्यासाठी विद्यार्थ्यांना परवाना देण्याआधी त्याला वाहतुकीचे नियम माहीत आहे की, नाही त्याला दुचाकी व चारचाकी वाहन नीट चालवता येते की नाही याची मोटर वाहन निरीक्षक ट्रायल घेतात. त्यासाठी अनेक नागरिकांना व विद्यार्थ्यांना आरटीओच्या पायऱ्या झिझवाव्या लागतात. नियमाने कधी-कधी अपोर्टंमेट जास्त असेल तर दिवसभर थांबवावे लागते. त्यामुळे दलालांना पैसे देऊन ट्रायल न करताच आपल्याला परवाना मिळाला तर बरे होऊल असे नागरिकच दलालांना विंनती करतात, त्यामुळे तगळे दर आकारण्यात येतात साहेब आपले ओळखीचे आहे. फक्त कागदपत्रे व पैसे द्या, काम होऊन जाईल, असे दलालांच्यावतीने नागरिकांना हमी दिली जाते. यातून महिन्याकाठी लाखो रुपये उखळण्याचा गौरखधंदाच त्यांनी थाटला आहे. मोटर वाहन निरीक्षक, सह.मोटर वाहन निरीक्षकही नियमात आलेल्या नागरिकांचे काम लवकर होत नाही. त्याला विविध कागतपत्रांची पूर्तता करण्याची अट घालतात मात्र कुठल्याही दलालांच्या कागतपत्रानवर त्वरित स्वाक्षरी मिळत असल्याचे निदर्शनास आले आहे. तत्कालीन परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी अश्या दलालांवर कारवार्इंचा बळगा उगारला होता. तो खडसे दलाल कोण ?येथे 'लोकमत'चे प्रतिनिधी शिकाऊ परवाना व इतर वाहनांचा परवाना काढण्यासाठी आरटीओ कार्यालयात गेले. तेथे ते एका खडसे नामक दलाला भेटले असता शिकाऊ परवाना काढण्याचे ४०० रुपय तर दुचाकी व चारचाकी वाहनांचा परवाना सोबत काढायचे असेल तर २,२०० रुपये पडतात. महिनाभरात काढून देऊ, असे सांगण्यात आले. हा दलाल कार्यालयात व कार्यालयाबाहेर ग्राहक शोधत फिरत होता. हा आतमध्ये शिरतोच कसा व अधिकारी त्याचे काम का करतात, असा प्रश्न येथे आलेल्या सामान्य नागरिकांना पडला आहे. आरटीओच्या प्रवेशव्दारावरच दलालराजआरटीओ कार्यालयाच्या बाहेरील प्रवेशव्दाराजवळच दलालराज सुरू आहे. नागरिक कार्यालयात शिरण्यापूर्वीच त्याला या दलालांकडून काम विचारण्यात येते. याच ठिकाणी राजरोसपणे पैशाची देवाणघेवाण करण्यात येते. येथेच सर्वांच्यासमोर कागतपत्रे स्वीकारली जातात. हा प्रकार अधिकाऱ्यांच्या डोळयांदेखत सुरू असताना प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी डोळे मिटून का बसले आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.