शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

एसडीओंच्या ‘त्या’ पेटीत बरेच काही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 23:19 IST

अचलपूरचे उपविभागीय अधिकारी यांच्या कस्टडीत असलेल्या दोन पेट्यांमध्ये मौल्यवान वस्तू पडून आहेत.

ठळक मुद्देसोन्याच्या कड्यासह मौल्यवान वस्तू : २७ वर्षांपासून बंद अवस्थेत, कुतूहल वाढले

अनिल कडू।आॅनलाईन लोकमतपरतवाडा : अचलपूरचे उपविभागीय अधिकारी यांच्या कस्टडीत असलेल्या दोन पेट्यांमध्ये मौल्यवान वस्तू पडून आहेत. या मौल्यवान वस्तू जवळपास दीडशे वर्षांर्हून अधिक जुन्या आहेत. यात सोन्याचे कडे, पोत, आणि पुरातन नाण्यांचा समावेश आहे. जप्त केलेल्या या मौल्यवान वस्तूंची किंमत कोट्यवधीच्या घरात आहे. या पेट्यांमध्ये मोगलांसह इंग्रजकालीन बरेच काही आढळून येण्याची शक्यता आहे.अचलपूर एसडीओंच्या नावे असलेल्या या दोन पेट्या अचलपूर कोषागार कार्यालयात आहेत. या पेट्यांची मालकी अचलपूर एसडीओ यांच्याकडेच आहे. दर तीन वर्षांनी एसडीओ या पेट्या उघडतील, पाहणी करतील व त्याची नोंद घेतील, असा नियम आहे. मात्र, प्रत्यक्षात या पेट्या मागील २७ वर्षांत कुणी उघडल्याच नाहीत. २७ वर्षांनंतर तत्कालीन एसडीओ म्हस्के यांनी या पेट्या उघडल्यात. त्यांनी पाहणी करून नोंदी घेतल्या. अन् पेट्या परत कुलूपबंद केल्यात. या पेट्यांमध्ये त्यांना नेमके काय आढळून आले याची माहिती बाहेर आली नाही. दुसरीकडे कोषागारात असलेल्या या पेट्या एसडीओंच्या असल्यामुळे कोषागार अधिकारी त्याला हातही लावत नाहीत. केवळ सुरक्षेची जबाबदारी ते स्वीकारून आहेत. या पेट्या उघडण्याचा अधिकार त्यांच्याकडे नाही. केवळ मौल्यवान वस्तू असलेल्या पेट्याा म्हणूनच ते त्याकडे बघतात. त्या पेट्या आणखी किती दिवस बंदच राहतील, असा प्रश्न पडला आहे.- तर होईल उलगडातत्कालीन एसडीओ म्हसके यांच्या नंतर आता अचलपूर एसडीओ डॉ. व्यंकट राठोड यांच्याकडे या पेट्या उघडण्याची जबाबदारी आहे. पण याकरिता त्यांना तीन वर्षांचा कालावधी पूर्ण होण्याची वाट बघावी लागणार आहे. राठोड यांनी या पेट्या उघडल्यानंतरच पेटीतील मौल्यवान वस्तूंचा उलगडा होऊ शकेल आणि रिझर्व्ह बँकेकडे त्या वस्तू जमा करण्याचा मार्ग मोकळा होईल.त्यात असावे तरी काय?पेटीत असलेल्या मौल्यवान वस्तूंच्या विवरणासह नोंद असलेले नोंद रजिस्टर उपलब्ध नाही. केवळ एक कार्यालयीन टिपण्णी आहे. या टिप्पणीवरच पेटी उघडली जाते. वस्तू बघितल्याची नोंद अचलपूर एसडीओ घेतात. इंग्रजी राजवटीत अचलपूर हा जिल्हा होता. जिल्ह्याचे मुख्यालय अचलपूरला होते. तत्कालीन इंग्रज आधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या मौल्यवान वस्तू या पेट्यांमध्ये असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.अनेक एसडीओंनी पेट्या उघडल्याच नाहीप्रत्यक्षात या मौल्यवान वस्तू तत्कालीन अधिकार्यांनी तेव्हाच रिजर्वबँकेकडे जमा करायला हव्या होत्या . पण त्या अजूनही अचलपूर मध्येच दोन पेट्यांमध्ये मध्ये पडून आहेत. दर तीन वर्षांनी पेटी उघडण्याचा, मौल्यवान वस्तू बघून नोंदी घेण्याचा दंडक असतानाही अचलपूर मधून बदलून गेलेल्या अनेक एसडीओनी त्यांच्या कार्यकालात याची दखलही घेतली नाही. किंबहुना अधिनस्त यंत्रनेने त्यांना याची कल्पनाच दिली नाही .