शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

वनकर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत अधिकाऱ्यांसमवेत मंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 23:16 IST

वनविभागात ‘वरिष्ठ तुपाशी, कनिष्ठ उपाशी’ अशी स्थिती निर्माण झाली असून ती बदलविण्यासाठी महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेने एग्लार पुकारला.

ठळक मुद्देवनपाल संघटनेचा पुढाकार : सीसीएफना निवेदन

आॅनलाईन लोकमतअमरावती : वनविभागात ‘वरिष्ठ तुपाशी, कनिष्ठ उपाशी’ अशी स्थिती निर्माण झाली असून ती बदलविण्यासाठी महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेने एग्लार पुकारला. वनकर्मचाºयांच्या समस्या, प्रश्न त्वरेने सोडवा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देत पदाधिकाऱ्यांनी मुख्य वनसंरक्षकांसोबत मंथन बैठक घेतली.मुख्यवनसंरक्षक प्रवीण चव्हाण, व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक एम. एस. रेड्डी यांच्याशी झालेल्या मंथन बैठकीत आंतरवृत्तीय वनपाल बदली, मासिक वेतन, ज्येष्ठता यादी अद्ययावत करणे, सेवा पुस्तिकेची दुय्यम प्रत मिळावी, निवासस्थानाची समस्या दूर व्हावी, गोपनीय अहवाल मिळावा, वनकर्मचाऱ्यांना ओळखपत्र मिळावे, वेतन पळताळणी करावी, पदोन्नतीतील त्रृट्या दूर व्हाव्यात, कालबद्ध पदोन्नती मिळावी, वनकर्मचाऱ्यांना हल्ल्यांतून संरक्षण मिळावे, वनमजुरांना पात्रतेनुसार सामावून घ्यावे, सेवानिवृत्ती निश्चित करावी, सामाजिक वनीकरणात कामाचे क्षेत्र निश्चित करावे, वनरक्षक चेतन लवटे यांच्या मृत्युबाबत लाभाचा आढावा घ्यावा, व्याघ्र प्रकल्पात रेशन भत्ता मिळावा, वनकल्याण निधी देण्यात यावा, वनकर्मचाºयाच्या संघटनांनी सादर केलेल्या समस्या, प्रश्न तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी करण्यात आली. यावेळी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील, सुधीर हाते, माधव मानमोडे, विजय युवरेकर, बापुराव गायकवाड, सुधीर आगरकर, विवेश पाथ्रीकर, विजय शिंदे, विनोद ढवळे, सैय्यद करीम, मधुकर रेचे, विनोद निर्मळ, देविदास कास्देकर, एम.बी. खान आदी उपस्थित होते.