शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंब नियोजनाआड ‘पुरुषी’ अंधश्रद्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 22:50 IST

स्त्री-पुरुष समानतेचे कितीही नारे दिले तरी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेबाबत पुरुषांकडून महिलांनाच पुढे केले जात आहे. जिल्ह्यात पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेच्या मागील पाच वर्षांत ४ हजार ११६ उद्दिष्टापैकी आतापर्यंत २ हजार ८२८ पुरुषांनी ही शस्त्रक्रिया केली आहे. विशेष म्हणजे, २०१४-१५ पासून दरवर्षी यामध्ये घट होत आहे.

ठळक मुद्देसंततीनियमन : जिल्ह्यात पाच वर्षांमध्ये २८२७ शस्त्रक्रियांची नोंद

जितेंद्र दखने ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्त्री-पुरुष समानतेचे कितीही नारे दिले तरी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेबाबत पुरुषांकडून महिलांनाच पुढे केले जात आहे. जिल्ह्यात पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेच्या मागील पाच वर्षांत ४ हजार ११६ उद्दिष्टापैकी आतापर्यंत २ हजार ८२८ पुरुषांनी ही शस्त्रक्रिया केली आहे. विशेष म्हणजे, २०१४-१५ पासून दरवर्षी यामध्ये घट होत आहे.महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेपेक्षा पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया सोपी असते. महिलांची टाक्याची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करायची असेल, तर किमान तीन दिवस दवाखान्यात घालवावे लागतात. मात्र, पुरुषांची नसबंदी शस्त्रक्रिया दोन तासात उरकते. तरीही पुरुषांची या शस्त्रक्रियेसाठी नकारात्मक भूमिका असते. जिल्ह्यात २०१६-१७ या वर्षात ६३३ पुरुषांनी नसबंदी करून घेतली होती. गतवर्षी ३३१ पुरुषांनीही शस्त्रक्रिया केली आहे. नसबंदी करून घेणाऱ्या पुरुषांना १ हजार ४०० रुपये देण्यात येतात.खुल्या प्रवर्गातील स्त्रियांना नसबंदी केल्यानंतर २५० रुपये, तर दारिद्र्यरेषेखालील किंवा सामाजिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना ६०० रुपये दिले जातात. पुरुष नसबंदीसाठी पाचपट अधिक रक्कम देऊनही स्त्रियांच्या नसबंदीच्या तुलनेत पुरुषांच्या नसबंदीचे प्रमाण मागील काही वर्षात सातत्याने घसरत आहे. पुरुष नसबंदी बाबत समाजात अनेक गैरसमज पसरले आहेत. यामुळे सुशिक्षित पुरुषही पुढे येत नाहीत. समाजामध्ये अजूनही पुरुष नसबंदीबाबत अढी कायम असल्याने स्त्रियांचा नसबंदी करण्याकडे अधिक कल आहे. त्यामुळे पुरुष नसबंदीचे प्रमाण वाढत नाही.‘लहान कुटुंब-सुखी कुटुंब’ ही संकल्पना मागील दोन दशकांत सर्वदूर पोहोचली असली तरी कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रियेत म्हणावी तशी गती पकडली दिसत नाही. यामध्ये पुरुष अजूनही मागे असल्याची चित्र दिसून येत आहे.राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रातंर्गत आरोग्य विभागाला मागील पाच वर्षात ४ हजार ११६ उद्दिष्टापैकी आतापर्यंत २ हजार ८२७ पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया केली आहे. सदरचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आरोग्य विभागाचे प्रयत्न आहेत.- डॉ. सुरेश असोलेजिल्हा आरोग्य अधिकारी