शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
3
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
4
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
5
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
6
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
7
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
8
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
9
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
10
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
11
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
12
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
13
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
14
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
15
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
16
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
17
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
18
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
19
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
20
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

जयसिंग संस्थेवर मंगरोळे गटाचा झेंडा

By admin | Updated: May 20, 2015 01:05 IST

तालुक्यातील पथ्रोट येथील जयसिंग विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या निवडणुकीत वासंती मंगरोळे यांच्या साईरत्न पॅनेलचा दणदणीत विजय झाला.

अचलपूर : तालुक्यातील पथ्रोट येथील जयसिंग विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या निवडणुकीत वासंती मंगरोळे यांच्या साईरत्न पॅनेलचा दणदणीत विजय झाला. तेरा पैकी बारा जागांवर अधिक मतांनी उमेदवार निवडून आले आहेत. रविवारी पार पडलेल्या निवडणुकीत कर्जदार गटामधून अजय भीमराव कडू (७७६ मते), रामेश्वर जगन्नाथसिंह टेहरे (६८९), मुरारी भागचंद अग्रवाल (७५९), ज्ञानेश्वर सोनाजी दिप्टे (६६६), राजेंद्र गणेश कान्हेरकर (६९८), रमेश साहेबराव कडू (६७०), अमोल रामेश्वर काळपांडे (७०५), शेख इस्त्राईल शे. कदीर (६६७) मते घेऊन विजयी झाले. अनुसूचित गटातून कमलाकर दांडगे (७२०), महिला राखीव गटातून ज्योती अशोक काळपांडे (७३७), ओबीसी गटातून जयवंत गुणवंत हरणे (८१३), विमुक्त भटक्या जमाती गटातून महेंद्र सहदेवराव नागे (७८१) आदी एकूण १२ उमेदवार निवडून आले. त्यांच्या या निवडीबद्दल गावातून साईरत्न पॅनेलच्या वासंती मंगरोळे यांच्या नेतृत्वात भव्य मिरवणूक काढण्यात आली. ग्रामपंचायत सहसोसायटीवर झेंडाअचलपूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून गणली जाणाऱ्या पथ्रोट ग्रामपंचायतीवर वासंती मांगरोळे यांच्या साईरत्न पॅनेलने घवघवीत यश प्राप्त केले. नंतर लगेच झालेल्या जयसिंग सहकारी विविध कार्यकारी संस्थेवर सलग विजय मिळविला. विरोधकांना धूळ चारत मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. निवडणूक सहायक निबंधक एस.टी. केदार यांच्या नेतृत्वात पार पडली. साईरत्न पॅनलच्या वासंती मंगरोळे, सरपंच काशिनाथ सुरोडे, उपसरपंच गोपाळराव कावरे, योगेश दुबे, विलास मंगरोळे, शे. आरीफ, किशोर पटोकार, संतोष मागे, सुधीर खडेकर, धनराज मंगरोळे, राहुल कडू, गोपाल कडू, रुपलाल वरघट, राजा काकड विजयी मिरवणुकीत सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)