कुलसचिव : 'व्हीजिलन्स अवेअरनेस वीक'निमित्त विद्यापीठात वक्तृत्व स्पर्धाअमरावती : समाज सुधारण्यासाठी त्याचा विकास होण्यासाठी प्रत्येकांमधील उच्चत्तम नैतिकता महत्त्वाची आहे. उच्चत्तम मूल्य असलेली नैतिकता समाजात रूजावी याची दक्षता प्रत्येकाने घ्यावयाची असून त्याची सुरूवात मी पासून करा, असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलसचिव अजय देशमुख यांनी केले. विद्यापीठाचा पदव्युत्तर संगणकशास्त्र विभाग व बँक आॅफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ आॅक्टोबर ते ५ नोव्हेंबर हा आठवडा 'व्हीजीलन्स अवेअरनेस वीक' म्हणून साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये दक्षता वाढावी, याकरिता वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन दृकश्राव्य सभागृहात विद्यापीठाच्या पदव्युत्तर शैक्षणिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले. बक्षीस वितरणप्रसंगी अध्यक्षस्थानावरून कुलसचिव बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र डेव्हल्पमेंट कार्पोेरेशनचे प्रादेशिक व्यवस्थापक प्रशांत सवई, बँक आॅफ महाराष्ट्र अमरावतीचे झोनल मॅनेजर महेंद्र काबरा, संगणकशास्त्र विभागप्रमुख विलास ठाकरे उपस्थित होते. स्पर्धेत प्रथम पारितोषिक ऋतुजा राऊत, द्वितीय श्रद्धा करडे, तर तृतीय अमृता वऱ्हेकर यांना मिळाले. सहभागी विद्यार्थ्यांनी ज्यांना पारितोषिके मिळाली नाहीत त्यांनी स्पर्धेपासून प्रेरणा घेऊन भविष्यात संधीचे सोने करावे, असे आवाहन कुलसचिवांनी केले. प्रमुख अतिथी प्रशांत सवई, काबरा होते. स्पर्धेच्या माध्यमातून सहभागी विद्यार्थ्यांनी जे विचार मांडले, श्रवण केले ते जास्तीत-जास्त लोकापर्यंत पोहचावे, असे आवाहन करून विद्यापीठाने अशा महत्त्वपूर्ण कार्यक्रमांचे आयोजनात सहकार्य केल्याबद्दल त्यांनी आभार मानले. प्रास्ताविक स्वाती शेरेकर यांनी केले. स्पर्धेचे परीक्षण सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील नीरज घनवटे व ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागप्रमुख वैशाली गुडधे यांनी केले. विलास ठाकरे यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. संचालन पूजा पाठक, आदिती कुलकर्णी हिने, तर आभार अंबिका जयस्वाल यांनी मानले. यावेळी महाराष्ट्र बँकचे राजभाषा अधिकारी मोहन टोंगे, विद्यापीठ शाखा प्रबंधक अरुणकुमार आठवले, कार्मीक अधिकारी हेमंत पांडे व विद्यार्थी, अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी संध्या शिरभाते, राधिका खारोडे, पूजा हरणे, नयन अर्डक, झेड. काजी, आलोकसिंग ठाकूर, नितीन गोळे यांनी परिश्रम घेतले. (कार्यक्रमाचे फोटो आपल्या ई-मेलवर पाठविले आहे. (प्रतिनिधी)े.
संत गाडगेबाबा विद्यापीठ नॅकद्वारा मानांकन प्राप्त
By admin | Updated: October 24, 2016 00:17 IST