शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कलेतून तो देतोय देशभक्तीचे धडे, एक हजार विद्यार्थ्यांना शिकविली पेंटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 14:24 IST

- मोहन राऊतअमरावती- राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करणारे वीर, महापुरुष यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळावे म्हणून त्यांची जयंती, पुण्यतिथी व राष्ट्रीयदिनी प्रत्येक शाळेत जाऊन रांगोळी तसेच पेंटिंगच्या माध्यमातून देशभक्तीचे दर्शन घडविण्याचे अविरत कार्य तो सात वर्षांपासून करीत आहे. या माध्यमातून अगदी अल्प वयातच त्याने विद्यार्थ्यांमधील चित्रकलेच्या गुणांना उजाळा दिला. विद्यानगरी धामणगावातील शिवाजी वॉर्डस्थित ...

- मोहन राऊतअमरावती- राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करणारे वीर, महापुरुष यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळावे म्हणून त्यांची जयंती, पुण्यतिथी व राष्ट्रीयदिनी प्रत्येक शाळेत जाऊन रांगोळी तसेच पेंटिंगच्या माध्यमातून देशभक्तीचे दर्शन घडविण्याचे अविरत कार्य तो सात वर्षांपासून करीत आहे. या माध्यमातून अगदी अल्प वयातच त्याने विद्यार्थ्यांमधील चित्रकलेच्या गुणांना उजाळा दिला. विद्यानगरी धामणगावातील शिवाजी वॉर्डस्थित रहिवासी आणि आदर्श महाविद्यालयात इयत्ता बारावीत विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या सुशांत प्रकाश जयस्वालचा प्रवास आगळा आहे़ नाविन्याची आस व देशभक्तीची आगळी गुंफण या छंदवेड्या विद्यार्थ्याने आपल्या प्रयत्नांतून साध्य केली आहे. इयत्ता पाचवीपासून सुशांत हा प्रत्येक शाळेत जाऊन महापुरुषांची जयंती-पुण्यतिथी यानिमित्त तेथील गरीब विद्यार्थ्यांना रांगोळी व पेंटिंगद्वारे विद्यार्थ्यांकडून चित्र काढून घेतो. आतापर्यंत त्याने अमर शहीद भगतसिंह, लालबहादूर शास्त्री, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ़ ए़पी़जे़ अब्दुल कलाम, इंदिरा गांधी, सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे चित्र काढण्याची कला विद्यार्थ्यांना शिकविली आहे. पाने-फुले, व्यसनमुक्ती, पर्यावरण संवर्धन, शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक, बुद्धांची ध्यानस्थ मुद्रा, हरणाचा कळप तसेच धार्मिक विषयांना स्पर्श करणारी चित्रे विद्यार्थ्यांना तो शिकवितो. गरीब विद्यार्थ्यांकडे चित्र काढण्यासाठी साहित्य नसल्यास कधी आपल्या मित्रांचे व वडिलांचे सहकार्य घेऊन स्वत:च्या खर्चातून रंग, कॅनव्हास, ब्रश, डिश, पेपर, माऊंट पेपर, स्केचपेन, रंगीत पेन्सिल, ड्रॉइंग बोर्ड अशी साहित्य उपलब्ध करून देऊन कलेची आवड निर्माण करून देण्याचे काम सुशांत जयस्वाल करीत आहे. आतापर्यंत एक हजार विद्यार्थ्यांनी ही पेंटिंग व चित्रकलेची आवड त्याच्या माध्यमातून जोपासली आहे.