शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

चाकूने वार करून दुचाकीवर अपहरण; रुग्णालयाच्या गेटवर टाकून काढला पळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2022 12:14 IST

आरोपीने अन्य एका आरोपीसह गंभीर अवस्थेत असलेल्या मजिद याला दुचाकीवर बसविले. व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आणून टाकून दिले.

ठळक मुद्देमेहबूबनगरात रक्तरंजित थरार : जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू, तिघांविरुद्ध गुन्हा

अमरावती : जुन्या वैमनस्यातून एका तरुणावर चाकूने वार करण्यात आले. त्याला त्याच गंभीर स्थितीत दुचाकीवर बसवत जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर टाकून पळ काढण्यात आला. हल्लेखोरांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या त्या तरुणाचा अखेर काही क्षणातच मृत्यू झाला. २७ जून रोजी पहाटे १.१५ ते १.३०च्या सुमारास मेहबूबनगर भागात हा रक्तरंजित थरार घडला. याप्रकरणी नागपुरी गेट पोलिसांनी मृताच्या पत्नीच्या तक्रारीवरून तीन हल्लेखोरांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला.

अब्दुल मजिद अब्दुल अजीज (४०, मेहबूबनगर) असे मृताचे नाव आहे. अद्याप खुनामागील कारण स्पष्ट झाले नसले तरी जुन्या वैमनस्यातून हा थरार घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तक्रारीनुसार, अ. मजिद हे आपल्या कुटुंबासह झोपले असताना सोमवारी पहाटे १.१५ च्या सुमारास तिघांनी त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावला. त्यामुळे ते कुटुंबासह घराबाहेर आले. त्यावेळी बाहेर उभे असलेल्या रियाजखान हाफीजखान (जमियानगर), फिरोज बाली जहीर बाली (रा. नुरनगर) व शब्बीर शाह (रा. मेहबूबनगर) यांनी अ. मजिद याला शिवीगाळ केली. त्यामुळे अन्य काही शेजारीदेखील जागे झाले.

वादादरम्यान आरोपी रियाज खान याने अ. मजिद याच्या पोटावर, मांडीवर व मानेवर चाकूने वार केले. त्याच्या पत्नीने आरडाओरड केली. मजिद यांना कुठे घेऊन चालतात, ते गंभीर जखमी झाले आहेत, त्यांना दवाखान्यात न्या, अशी आर्जव पत्नीने केली. मात्र, आरोपीने अन्य एका आरोपीसह गंभीर अवस्थेत असलेल्या मजिद याला दुचाकीवर बसविले. व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आणून टाकून दिले.

सुरक्षा रक्षक स्ट्रेचरकडे, आरोपी फरार

अ. मजिदचा अपघात झाल्याचे सुरक्षारक्षकाला सांगताच तो सुरक्षारक्षक स्ट्रेचर आणण्यासाठी आत गेला. तेवढ्या वेळात आरोपींनी तेथून पळ काढला. पहाटे २ च्या सुमारास उपचारादरम्यान अ. मजिद याचा मृत्यू झाला. हल्ल्याची घटना मृताच्या पत्नीसमक्ष घडली. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह, उपायुक्त एम. एम. मकानदार, सहायक पोलीस आयुक्त पूनम पाटील व ठाणेदार पुंडलिक मेश्राम यांनी घटनास्थळी भेट दिली.

तीन दिवसाआड खुनाची हॅटट्रिक

२१ जून रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास शहर कोतवाली हद्दीत उमेश कोल्हे या व्यावसायिकाचा खून करण्यात आला होता. २४ जून रोजी सायंकाळी बडनेरा ठाण्याच्या हद्दीत अंजनगाव बारी येथे मुरलीधर नांदणे यांची हत्या करण्यात आली. तर आता महबुबनगर येथे रक्तरंजित थरार घडला.

महबूबनगरातील ४० वर्षीय व्यक्तीच्या हत्याप्रकरणी तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. आरोपींच्या शोधार्थ पोलीस पथके पाठविण्यात आली आहेत.

- पुंडलिक मेश्राम, ठाणेदार, नागपुरी गेट

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती