शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

झुंजीत नर बिबट ठार, मेंदूत अंतर्गत अतिरक्तस्त्रावामुळे मृत्यू; दिला भडाग्नी

By गणेश वासनिक | Updated: December 17, 2023 22:10 IST

पशू वैद्यकीय अधिकाऱ्याच्या देखरेखीत मृत बिबट्याचे विच्छेदन

गणेश वासनिक, अमरावती: दोन बिबट्यांमध्ये झालेला संघर्ष आणि झुंजीनंतर एक नर बिबट ठार झाल्याची घटना विद्यापीठाच्या मागील बाजूस राजुरा नाका पेट्रोल पंपसमोरील उत्तर वडाळी नियतक्षेत्र वनखंड क्रमांक ७ येथे रविवारी सकाळी १०.३० वाजता सुमारास निर्दशनास आली.

मृत बिबट्याचा वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा करून विच्छेदनासाठी वडाळी येथील वन्यप्राणी प्रथमोपचार केंद्रात नेण्यात आल्याची माहिती वनविभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. वनकर्मचाऱ्यांनी उपवनसंरक्षक अमितकुमार मिश्रा, सहायक वनसंरक्षक ज्योती पवार यांना बिबट ठार झाल्याची माहिती दिली. त्यानंतर वडाळीच्या आरएफओ वर्षा हरणे यांच्यासह चमूने घटनास्थळ गाठले असता मृत बिबट हा नर असून, ५० फूट अंतरावर रक्तस्त्राव दिसून आला. बिबट्याच्या डोक्यावर नखाचे ओरखडे, तर जीभ दातांमध्ये दबली होती. पंजे आणि चेहऱ्यावर नखांच्या ओरखडल्याच्या खुणा आढळून आल्या. तसेच तोंडातून रक्त येत असल्यामुळे हा बिबट झुंजीत ठार झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला. त्याअनुषंगाने बिबट्याच्या मृत्युप्रकरणी वनविभागाने वनगुन्हा क्रमांक ०००६१/०१५०२ अन्वये १७ डिसेंबर २०२३ नुसार जारी केला आहे./////////////////////वडाळी वन्यप्राणी प्रथमोपचार केंद्रात विच्छेदनमृत बिबट्याला वडाळी वन्यप्राणी प्रथमोपचार केंद्रात विच्छेदनासाठी आणले. त्यानंतर पशुधन विकास अधिकारी डॉ. ए. जे. मोहोड, पशुधन विकास अधिकारी डॉ. सागर ठोसर यांनी मृत बिबट्याची पाहणी करून प्राथमिक तपासणी केली. त्याच्या शरीरावर असलेल्या खुणा, ओरखडे आदींची नोंद पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली. मानद वन्यजीव रक्षक सावन देशमुख, वडाळीच्या आरएफओ वर्षा हरणे, वनपाल, वनरक्षक यांच्यासह दोन पंचासमक्ष पशु शल्यचिकित्सकांनी विच्छेदन केले. बिबट्याच्या डोक्यावरील आतील भागात जखम झाल्याने मेंदूत अंतर्गत अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे बिबट्याचा मृत्यू झाला असावा असा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला.त्यानंतर बांबू गार्डन परिसरातील नियोजितस्थळी नियमानुसार मृत बिबट्याला भडाग्नी देण्यात आला./////////////////पशु शल्यचिकित्सकांच्या प्राथमिक अहवालानुसार मृत बिबट्याच्या मेंदूत अंतर्गत अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. दोन बिबट्यात संघर्ष होऊन झुंज झाली असावी, असा अंदाज आहे. विद्यापीठाच्या मागील बाजूकडील जंगलात बिबट्यांची संख्या बऱ्यापैकी आहे.- ज्योती पवार, एसीएफ, अमरावती

टॅग्स :leopardबिबट्या