शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

२१ दिवसांत खतनिर्मिती करा अन् १ लक्ष रुपयांचे बक्षीस घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 23:05 IST

बायोकल्चर फवारणीतून सुकळी कम्पोस्ट यार्डमधील सुमारे आठ लाख टन कचऱ्याचे खत २१ दिवसांत निर्माण करून दाखवा आणि एक लक्ष रुपयांचे पारितोषिक आमच्याकडून घ्या, असे आव्हान पर्यावरण तज्ज्ञ नंदकिशोर गांधी, किशोर देशमुख आणि प्रकाश लढ्ढा यांनी महापालिका आयुक्त संजय निपाणे यांना दिले आहे.

ठळक मुद्देपर्यावरणप्रेमींचे महापालिकेला आव्हान : १५ दिवसांपासून धगधगतेय कचराभूमी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बायोकल्चर फवारणीतून सुकळी कम्पोस्ट यार्डमधील सुमारे आठ लाख टन कचऱ्याचे खत २१ दिवसांत निर्माण करून दाखवा आणि एक लक्ष रुपयांचे पारितोषिक आमच्याकडून घ्या, असे आव्हान पर्यावरण तज्ज्ञ नंदकिशोर गांधी, किशोर देशमुख आणि प्रकाश लढ्ढा यांनी महापालिका आयुक्त संजय निपाणे यांना दिले आहे.अमरावती शहराच्या सुकळी कम्पोस्ट डेपोतील कचऱ्यावर बायोकल्चर (जैवसंवर्धन) द्रावणाची फवारणी करून २१ दिवसांत खतनिर्मिती करून समस्येवर उपाय योजण्याची माहिती महापालिकेने जाहीर केली होती. या पार्श्वभूमीवर गांधी आणि देशमुख यांनी महापालिका आयुक्तांना हे आव्हान दिले आहे.अमरावतीच्या कचराभूमीत सुमारे आठ लक्ष टन कचरा एकत्रित झाला आहे. आग लागल्यामुळे हा कचरा १५ दिवसांपासून धगधगत आहे. या कचऱ्यापासून सातत्याने अत्यंत घातक वायूचे उत्सर्जन होत आहे. सुमारे दहा चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या वातावरणात हा वायू आच्छादला गेला आहे. या वायू उत्सर्जनामुळे कचराभूमीजवळील लोकांनी इतरत्र स्थलांतर सुरू केले आहे.सातत्याने जळण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे कचऱ्यातील खतनिर्मितीयोग्यतेचे घटक नष्ट झाले आहेत. आता शिल्लक असलेला कचरा अर्थात राख आहे. जो कचरा जळला नसेलही, तो विघटन होऊ न शकणारा आहे. अशा कचऱ्याचे खत होणे कदापिही शक्य नाही. महापालिकेने केलेला दावा हा सामान्य करदात्यांच्या डोळ्यांत केलेली धूळफेक आहे. नागरिकांनी ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवावा, असे सांगणारी महापालिका स्वत: मात्र दोन्ही प्रकारचा कचरा एकत्र करते. कचराभूमीत ते चित्र आम्ही अनेकदा बघितले आहे. पर्यावरण चळवळीचे दिल्लीतील कार्यकर्तेही या कचराभूमीला भेट देऊन गेले. त्यांनीही तेथील अव्यवस्थेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. यूट्यूबवर त्यासंबंधी रिपोर्ट दिल्लीतील मंडळींनी अपलोड केला आहे.२०० लिटरचे गणित अनाकलनियकचऱ्यावर २०० लिटर बायोकल्चर फवारणार असल्याचे आणि त्यातून खतनिर्मिती करणार असल्याचे महापालिकेने प्रसिद्धी माध्यमांतून जाहीर केले आहे. आठ लक्ष टन कचºयासाठी इतकेसे बायोकल्वर अर्थात ‘उंट के मुंह मे जिरा’ अशी स्थिती आहे. सर्वच कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी लक्षावधी लिटर बायोकल्चरची आवश्यकता असेल. त्यासाठी महापालिकेने निरीसारख्या संस्थेला पाचारण करावयास हवे. निविदा काढूनच योग्य संस्थेला कंत्राट द्यावयास हवे, असे मत गांधी आणि देशमुख यांनी व्यक्त केले आहे.कचरा निर्मूलनाचे कुठलेही उपाय योजलेले नाहीत. महापालिका आयुक्तांनी नागरिकांच्या डोळ्यांत धूळफेक केली आहे. अशाच कारणांसाठी वाशी आणि इतर महापालिकांच्या आयुक्तांना शिक्षा ठोठावली गेली आहे. आम्हीदेखील केंद्रीय हरित लवादात खटला भरणार आहोत.- नंदकिशोर गांधी, प्लास्टिकबंदी अधिनियम तथा पर्यावरण तज्ज्ञकचरा सतत धुमसत असताना महापालिकेने काहीच करू नये, हा गुन्हाच आहे. सुकळी परिसरातील लोक स्थलांतरित होत आहेत. कचरा निर्मूलनाचे नियम अत्यंत कठोर आहेत. महापालिका आयुक्तांना नागरिकांनी निवेदन देऊनही त्यांची निष्क्रियता आश्चर्यकारक आहे.- किशोर देशमुख,भूवैज्ञानिक तथा पर्यावरण तज्ज्ञ