शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

पाटबंधारे विभागाच्या इमारतीचे मेंटेनन्स शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 22:50 IST

३५ ते ३८ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या पाटबंधारे विभागाच्या वसाहतीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाच्या इमारतीची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या इमारतीचे दागडुजी करून रंगरंगोटी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

ठळक मुद्देरंगरंगोटी केव्हा? : अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष

संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ३५ ते ३८ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या पाटबंधारे विभागाच्या वसाहतीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाच्या इमारतीची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या इमारतीचे दागडुजी करून रंगरंगोटी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.मागील वर्षीच इमारतीचे स्ट्रकचरल आॅडिट करण्यात आल्याची माहिती अधिकाºयांनी दिली. मात्र, यातील एक इमारत क्षतिग्रस्त असल्याने यामध्ये कुणालाही राहण्यास मनाई करण्यात आलेली आहे. या ठिकाणी ३०० पेक्षा अधिक अधिकारी कर्मचारी रहिवासी आहेत. मात्र, काही ठिकाणचे शौचालय व प्रसाधनगृह चांगले नाही, तर काही ठिकाणी इमारतीला तडे गेलेले आहेत. त्याकारणाने या ठिकाणी विशेष निधी मंजूर करून पाटबंधारे विभागाच्या वसाहतीतील निवास्थानाची देखभाल दुरूस्ती करण्यात यावी व या ठिकाणी इमारतींची रंगरंगोटी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. ज्या इमारती क्षतिग्रस्त झाल्या आहेत व ज्याला तातडीने देखभाल व दुरूस्तीची आवशक्त आहे, अशा इमारतींच्या दुरुस्तीसाठी साडेतीन कोटींचा आरखडा तयार करून तो मंजुरीसाठी विदर्भ पाटबंधारे विकास मंडळाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.सांडपाणी बाहेर काढण्यासाठी ३५ लाखांचा खर्चकर्मचाऱ्यांच्या निवासस्थानातील सांडपाणी बाहेर काढण्यासाठी सांडपाण्याच्या भूमिगत नाल्यांचे बांधकाम करून ते पाणी पाटबंधारे विभागाच्या वसाहतीमधून मुख्य नालीत सोडण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे पावसाळ्यात तुंबणाऱ्या नाल्या व त्यापासून निर्माण होणारी डासांची उत्पत्ती यापासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.