शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

झोन सभापतीपदांवर महिलाराज

By admin | Updated: April 11, 2017 00:23 IST

महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सोमवारी झालेल्या झोन सभापती अर्थात मिनी महापौर पदाच्या निवडणुकीत महिला नगरसेवकांनी मोहोर उमटविली.

भाजपकडे दोन मिनी महापौर : एमआयएम, सेना, बसपला संधीअमरावती : महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सोमवारी झालेल्या झोन सभापती अर्थात मिनी महापौर पदाच्या निवडणुकीत महिला नगरसेवकांनी मोहोर उमटविली. पाचही झोन सभापतीपदावर महिला नगरसेवकांची अविरोध निवड झाली. यात पहिल्या दोन झोनचे सभापतीपद भाजपकडे तर उर्वरित तीन सभापतीपद शिवसेना, बसपा आणि एमआयएमकडे गेले. आपसी समझोत्यानंतर नामांकन अर्ज परत घेतल्याने पाचही सभापती अविरोध निवडून आलेत.झोन क्रमांक १ च्या सभापतीपदाची माळ भाजपच्या सुरेखा लुंगारे तर मध्य झोन यादुसऱ्या झोनचे सभापतीपद भाजपच्याच लविना हर्षे यांच्याकडे गेले. झोन क्रमांक तीनच्या सभापतीपदावर बसपच्या माला देवकर यांची अविरोध निवड झाली. बडनेरा झोनचे सभापतीपद शिवसेनेने पटकावले. येथे भाजपचे चेतन गावंडे आणि एमआएमचे मो.साबीर यांनी नामांकन परत घेतल्याने शिवसेनच्या अर्चना बंडू धामणे या मिनी महापौर म्हणून अविरोध निवडल्या गेल्या. पाचव्या क्रमांकाच्या भाजीबाजार झोनची माळ एमआयएमच्या रजिया खातून यांच्या गळ्यात पडली. एकंदर सकारात्मक राजकारण झाल्याने काँग्रेस वगळता अन्य पक्षाचे नगरसेवक झोन सभापती ठरले.पाचही झोन सभापती अविरोधअमरावती : परस्पर तडजोड झाल्यानंतर सोमवारी ही निवडणूक अविरोध करण्याचे मत मांडण्यात आले. त्याला होकार देत सर्व गटनेत्यांनी ही निवडणूक अविरोध घडवून आणली. महापालिकेच्या स्व. सुदामकाका देशमुख सभागृहात सोमवारी सकाळी पिठासिन अधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी यांच्या उपस्थितीत ही निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. पाचही झोन सभापतींची अविरोध निवड झाल्यानंतर महापौर संजय नरवणे यांच्यासह उपमहापौर संध्या टिकले, स्थायी सभापती तुषार भारतीय, पक्षनेता सुनील काळे, विरोधी पक्षनेते बबलू शेखावत, बसपचे गटनेते चेतन पवार यांच्यासह सेनेचे प्रशांत वानखडे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. महापौर आणि उपमहापौर, स्थायी समिती सभापती आणि सभागृहनेतेपद पटकावणाऱ्या भाजपपाठोपाठ झोन सभापती निवडणुकीत बसप, सेना आणि एमआयएमने चमत्कार घडविला. महापालिकेच्या ८७ सदस्यीय सभागृहात भाजपकडे स्वत:च्या ४५ सदस्यांसह युवा स्वाभिमानचे ३ व अन्य एका अपक्षासह ४९, काँग्रेसकडे १५, एमआयएमकडे १०, शिवसेनेकडे ७, बसपचे ५ आणि अपक्ष १ असे संख्याबळ आहे. सोमवारी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राजकीय हालचालींना अधिक वेग आला होता. झोन क्रमांक १ रामपुरी कँम्पमध्ये भाजपचे १७ व काँग्रेसचे ३ सदस्य आहेत तर झोन क्रमांक २ राजापेठमध्ये भाजपचे वर्चस्व आहे. याझोनमध्ये एकूण १६ नगरसेवकांचा समावेश असेल. हमालपुरास्थित झोन क्रमांक ३ मध्ये भाजपकडे पाच, काँग्रेस व बसपकडे प्रत्येकी ४ तर शिवसेनेकडे २ असे एकूण १५ सदस्य आहेत. झोन क्रमांक चार बडनेरामध्ये भाजपचे ८, शिवसेनेचे ४, एमआयएम व बसपचा प्रत्येकी एक असे एकूण १६ सदस्य आहेत तर झोन क्रमांक पाच भाजीबाजारमध्ये काँग्रेस व एमआयएमचे प्रत्येकी ७, भाजपकडे ६ सदस्य आहेत. त्या अनुषंगाने सोमवारी झालेल्या अविरोध निवडणूक प्रक्रियेत भाजप पाठोपाठ एमआयएम, शिवसेना आणि बसपाने बाजी मारली.(प्रतिनिधी)