शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचा ‘शॉक’

By admin | Updated: May 11, 2016 00:29 IST

महावितरणने मे, जून व जुलै या तीन महिन्यांसाठी इंधन समायोजन आकार लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

वीज दरवाढ : तीन महिन्यांसाठी पुन्हा इंधन समायोजन आकार लागूअमरावती : महावितरणने मे, जून व जुलै या तीन महिन्यांसाठी इंधन समायोजन आकार लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ११ टक्के वीज दरवाढीमुळे दरमहा सुमारे ५०० कोटी रुपये ग्राहकांच्या खिशातून काढले जाणार आहेत. त्यामुळे हा वीज दरवाढीचा ‘शॉक’ सामान्य ग्राहकांचे कंबरडे मोडेल, यात दुमत नाहीे.मे, जून व जुलै २०१६ मध्ये येणाऱ्या अनुक्रमे एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांच्या बिलांमध्ये दरमहा किमान ५०० कोटींहून अधिक इंधन समायोजन आकार लागू करण्यात आला आहे. हा मागील दराने देण्यात आलेला ११ टक्के वीज दरवाढीचा ‘शॉक’ आहे. नोव्हेंबर २०१५ पासून तीन महिने दरमहा ५९१ कोटी रुपये इंधन समायोजन आकार लागू झाला होता. त्यानंतर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यापुढे इंधन समायोजन आकार लागू होणार नाही, तर काही ठिकाणी यापुढे इंधन समायोजन आकार अधिक लागणार नाही, असे जाहीर केले होते. तथापि या सर्व घोषणा फोल असल्याचे महावितरणने कृतीतून दाखवून दिल्याचा आरोप वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष तथा वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी केला आहे. २६ जून २०१५ रोजी नवीन वीज दर निश्चिती करताना आयोगाने सरासरी ८.५ टक्के दरवाढीला मंजुरी दिली आहे. तथापि त्यानंतर नोव्हेंबर २०१५ मध्ये १३ टक्के, फेब्रुवारी २०१६ मध्ये ९ टक्के व आता मे २०१६ मध्ये ११ टक्के इंधन समायोजन आकार लागू करण्यात आला आहे. सरासरी एकूण १९.५ टक्के वीज दरवाढ ग्राहकांच्या माथी मारण्यात आली आहे. वाढत्या, अवाजवी व बेकायदेशीर इंधन समायोजन आकारणीमुळे राज्यातील सर्व औद्योगिक वीज ग्राहकांमध्ये असंतोष पसरलेला आहे. राज्यात औद्योगिक वीजदर आसपासच्या राज्यांपेक्षा २५ ते ३५ टक्क्यांनी अधिक आहे. त्यामुळे मागील पाच वर्षांत औद्योगिक वीज वापरातील वाढ शून्य आहे. अशावेळी १० टक्के वीजदराचा फटका उद्योगधंद्यांसाठी जाचक आहे. वीज दरवाढीमुळे औद्योगिक क्षेत्रावर कुऱ्हाड कोसळून त्याचे दुष्परिणाम नक्की जाणवतील, अशा प्रतिक्रिया सामान्य वीज ग्राहकांमधून उमटत आहेत. वारंवार या ना त्या निमित्ताने विजेची दरवाढ करून ग्राहकांना मन:स्ताप दिला जात आहे. यामुळे सामान्य वीज ग्राहकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. छुप्या पध्दतीने होणारी ही वीज दरवाढ मागे घ्यावी, असा सूर देखील विद्युत ग्राहकांमधून उमटत आहे. असे असेल इंधन समायोजन आकार प्रति युनिटउच्चदाब उद्योग एक्स्प्रेस फीडर ९८.८६ पैसे, नॉन एक्स्प्रेस फीडर ७३.१३ पैसे, लघुदाब उद्योग २७ हॉर्स पॉवरच्या आत ६२.७२ पैसे आणि २७ हॉर्स पॉवरवरील ६९.१४ पैसे, घरगुती ग्राहक १०० युनिटपर्यंत ३७.०८ पैसे, ३०० युनिटच्यावर ११९.०७ पैसे अशी वीज दर आकारणी करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.असे असेल इंधन समायोजन आकार प्रति युनिटउच्चदाब उद्योग एक्स्प्रेस फीडर ९८.८६ पैसे, नॉन एक्स्प्रेस फीडर ७३.१३ पैसे, लघुदाब उद्योग २७ हॉर्स पॉवरच्या आत ६२.७२ पैसे आणि २७ हॉर्स पॉवरवरील ६९.१४ पैसे, घरगुती ग्राहक १०० युनिटपर्यंत ३७.०८ पैसे, ३०० युनिटच्यावर ११९.०७ पैसे अशी वीज दर आकारणी करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.महावितरणचा ४ वर्षांसाठी वीजदर वाढीचा प्रस्तावमहावितरण कंपनीने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगासमोर सन २०१६ ते २०२० या चार वर्षांसाठी वीज दरवाढीचा प्रस्ताव दाखल केला आहे. प्रस्तावात दरवर्षी ५.५ टक्के व चक्रवाढ पद्धतीने चार वर्षांत २४ टक्के याप्रमाणे वीज दरवाढीची मागणी करण्यात आली आहे. या प्रस्तावानुसार चार वर्षांत राज्यातील सव्वादोन कोटी वीजग्राहकांवर एकूण अतिरिक्त बोजा ३९००० कोटी रुपये लादण्यात आला आहे.वीज दरवाढ शासन निर्णयानुसार केली जाते. एप्रिल ते जून या तीन महिन्यांसाठी इंधन समायोजन आकार आकारणी करण्याचा शासन आदेश २६ एप्रिल रोजी प्राप्त झाला आहे. त्यानुसार आकारणी करण्यात येईल.- आर. बी. माहुरेकार्यकारी अभियंता, वीज वितरण कंपनीवीज कायद्याचे प्रमुख उद्दिष्ट्य स्पर्धा, कार्यक्षमता व त्याआधारे दरनियंत्रण करणे हे आहे. मात्र, बाजारात ३.२५ पैसे प्रति युनिट दराने वीज मिळत असताना महानिर्मिती कंपनी ४ ते ५ रुपये युनिट दराने खरेदी करीत आहे.- प्रताप होगाडेअध्यक्ष, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनाआधीच राज्यात वीजदर अधिक आहे. अशातच इंधन समायोजन आकार आकारणी होत असेल तर ते अन्यायकारक आहे. वीज दरवाढीच्या शासन निर्णयाचा कडाडून विरोध केला जाईल. याचा फटका शासनालाही नक्कीच बसेल.- किरण पातुरकरअध्यक्ष, एमआयडीसी असोसिएशन