शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडी आज आहे,उद्या मात्र सांगता येणार नाही; शरद पवार यांचे सूचक विधान

By गणेश वासनिक | Updated: April 23, 2023 19:54 IST

जेपीसी समितीत २१ जणांनी समिती असणार आहे. यात १५ सत्ताधारी तर सहा विरोधी पक्षाचे खासदार असतील. समितीचे अध्यक्ष हे सत्ताधारी पक्षाचे राहणार आहे.

अमरावती : राज्यात अस्तित्वात असलेल्या महाविकास आघाडीसोबत आज असलो तरी येत्या २०२४ मध्ये हाेणाऱ्या निवडणुकांमध्ये सोबत राहू अथवा नाही हे भविष्यातील सांगता येणार नाही, असे सूचक विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुप्रिमो खासदार शरद पवार यांनी रविवारी येथे दिले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत महात्मा फुले अग्रीक्लचर फोरमच्यावतीने अमरावती येेथे आयोजित राज्यस्तरीय कृषी पदवीधर संघटनेच्या मेळाव्यासाठी आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. दरम्यान कोणाला फोडोफोडीचे राजकारण करायचे असेल तर त्यांनी करावे,आम्ही आमची भूमिका घ्यायची ती घेऊ,असे ते म्हणाले. राहूल गांधी यांनी उद्योजक गौतम अडाणी यांच्यावर कर्ज बुडविल्याप्रकरणी जेपीसी गठित करण्याच्या मागणीविषयी बोलताना शरद पवार यांनी म्हणाले, जेपीसी हे सोल्युशन नाही.

जेपीसी समितीत २१ जणांनी समिती असणार आहे. यात १५ सत्ताधारी तर सहा विरोधी पक्षाचे खासदार असतील. समितीचे अध्यक्ष हे सत्ताधारी पक्षाचे राहणार आहे. त्यामुळे या समितीचा काय निर्णय येईल, हे मी वेगळे सांगण्याची गरज नाही. म्हणून जेपीसी नव्हे तर त्याऐवजी सर्वेाच्च न्यायालयाची समिती प्रभावी राहील, ही भूमिका मांडली. तरीही सहकारी पक्षांनी जेसीपीची मागणी केल्यास त्यांच्याबरोबरच असेल, असे पवार यांनी स्पष्ट केले.यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, माजी गृहमंत्री तथा आमदार अनिल देशमुख, राष्ट्रवादीच्या नेत्या सुरेखा ठाकरे, नितीन हिवसे, सधीर राऊत हे उपस्थित होते.... म्हणून प्रकाश आंबेडकरांनी घेतली भेट

वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर चर्चांना उधाण आले. मात्र यावर आता खुद्द शरद पवार यांनी कर्नाटक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली असून प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादी हे दोघेही कर्नाटकात काही जागा लढवत आहे. या जागांच्या अनुषंगाने आणि कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ही भेट झाल्याचे शरद पवार यांनी दुजोरा दिला. परिणामी आता राज्यातही वंचित राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.