शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

महाराष्ट्र संघाने मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 22:54 IST

येथील डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित राष्ट्रीय शालेय डॉज बॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाने मुलांच्या गटात दिल्ली, तर मुलींच्या गटात मध्यप्रदेशला धूळ चारली.

ठळक मुद्देदिल्ली, मध्यप्रदेश उपविजेता : राष्ट्रीय शालेय १७ वर्षांखालील डॉजबॉल स्पर्धा

आॅनलाईन लोकमतअमरावती : येथील डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित राष्ट्रीय शालेय डॉज बॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाने मुलांच्या गटात दिल्ली, तर मुलींच्या गटात मध्यप्रदेशला धूळ चारली.मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात महाराष्ट्र संघाने दिल्ली संघाला २-० ( दोन पाट्या व १४-३ गुण) असे नमविले. अतिशय रंजक ठरलेल्या मुलींच्या गटातील सामन्यात महाराष्ट्राने विद्याभारती (मध्य प्रदेश) संघाला २-० ( १५-२) ने पराभूत करून महाराष्ट्र संघाने जेतेपद आपल्या पारड्यात पाडून घेतले. बुधवारी पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.स्कूल गेम्स फेडरेशन आॅफ इंडियाच्या मान्यतेने अमरावती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा डॉजबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ६३ व्या राष्ट्रीय शालेय मुले व मुलींच्या १७ वर्षांखालील डॉज बॉल स्पर्धा अमरावती येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. दोन्ही स्पर्धांमध्ये महाराष्ट्र संघाने आपले वर्चस्व कायम ठेवल्याने मैदानावर उत्साहाचे व जल्लोषाचे वातावरण होते. या स्पर्धेत नऊ राज्यांतील शालेय विद्यार्थ्यांचे संघ सहभागी झाले होते. मुलांच्या संघाचे प्रशिक्षक आनंद उईके, तर मुलींच्या संघाचे प्रशिक्षक धीरज तायडे होते.स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमात बक्षीस वितरण झाले. यावेळी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले, दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या संचालिका कीर्ती गवई, प्राचार्य स्मिता देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, जिल्हा डॉज बॉल संघटनेचे अध्यक्ष वसंत लुंगे, पर्यवेक्षक शर्मा, सुगंध बंड, उदय ठाकरे, प्रल्हाद राऊत नितीन चवाळे, बबन आवारे, विश्वास जाधव, कैलास करवंदे आदी मान्यवरांच्या हस्ते विजेता व इतर संघाला पदक, चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी क्रीडाप्रेमींची गर्दी झाली होती.