शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

Maharashtra Election 2019 ; ‘वरी लिस्ट’ : २६३ केंद्रांवर दिल्लीवरून नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 6:00 AM

निवडणूक प्रक्रिया भयमुक्त वातावरणात पार पाडली जावी, यासाठी आयोग आग्रही आहे. याच अनुषंगाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीपासून जिल्ह्यातील एकूण मतदान केंद्रांच्या म्हणजेच २६२८ केंद्रांच्या १० टक्के अर्थात २६३ मतदान केंद्रांवर थेट प्रक्षेपणाद्वारे (वेब कास्टिंग) आयोगाची करडी नजर राहणार आहे.

ठळक मुद्देआरओ, सीईओ स्तरावरही थेट प्रक्षेपण : उमेदवारांनी सूचविलेल्या पोलिसांच्या ‘क्रिटिकल’ केंद्रांचा समावेश

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : उमेदवारांच्या लेखी चिंताजनक यादी (वरी लिस्ट) मधील किंवा पोलिसांच्या दृष्टीने क्रिटिकल असणाऱ्या २६३ मतदान केंद्रांवर यंदा निवडणूक विभागाच्या कॅमेऱ्यांचा रोख राहणार आहे. या केंद्रांवरील मतदानाची प्रक्रिया थेट प्रक्षेपणाद्वारे निवडणूक निर्णय अधिकारी, सीईओ मुंबई व निवडणूक आयोगाच्या दिल्ली कार्यालयातूनही पाहता येणार आहे. या ठिकाणावरून मतदान प्रक्रियेवर नियंत्रण ठेवले जाणार आहे.निवडणूक प्रक्रिया भयमुक्त वातावरणात पार पाडली जावी, यासाठी आयोग आग्रही आहे. याच अनुषंगाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीपासून जिल्ह्यातील एकूण मतदान केंद्रांच्या म्हणजेच २६२८ केंद्रांच्या १० टक्के अर्थात २६३ मतदान केंद्रांवर थेट प्रक्षेपणाद्वारे (वेब कास्टिंग) आयोगाची करडी नजर राहणार आहे. कॅमेऱ्याच्या माध्यमातून संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी, सीईओ मुंबई व निवडणूक आयोगाच्या दिल्ली स्थित कार्यालयातून या ठिकाणी नियंत्रण ठेवले जाणार आहे.आयोगाच्या सूचनेप्रमाणे, विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना चिंतेची वाटणाऱ्या मतदान केंद्रांची नावे ते निवडणूक निर्णय अधिकाºयांना देऊ शकतात तसेच पोलिसांच्या दृष्टीने संवेदनशील (क्रिटिकल) असणाऱ्या केंद्रांवर वेब कास्टिंग केले जाणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया पार पडली असून, संबंधित कंपनीद्वारे मतदान केंद्रावर इंटरनेट सुविधा, कॅमेरा, मतदान केंद्राबाहेर कर्मचारी व नियंत्रण कक्षात एक कर्मचारी अशी यंत्रणा तयार केली जाणार आहे. वेब कास्टिंगच्या सेटिंगनुसार दर मिनिटाला स्क्रीनवरील मतदान केंदे्र बदलत राहतील. याशिवाय संबंधित विधानसभा क्षेत्रातील महत्त्वाच्या तपासणी नाक्यावरदेखील वेब कास्टिंग केले जाणार आहे. अनेक ठिकाणी विजेचा अडसर आहे. मात्र, ज्या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी कॅमेºयाद्वारे वेब कास्टिंग केले जाण्याची शक्यता असल्याची माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयाने दिली.मतदारसंघनिहाय वेब कास्टिंग केंदे्रजिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण २६२८ मतदान केंद्रे आहेत. यापैकी १० टक्के म्हणजेच २६३ मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग केले जाणार आहे. यामध्ये धामणगाव रेल्वे मतदारसंघात ३७, बडनेरा ३३, तिवसा ३२, दर्यापूर ३४, मेळघाट ३५, अचलपूर ३० व मोर्शी मतदारसंघात ३१ केंद्रांचे या पद्धतीने थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.क्रिटिकल केंद्रांवर विशेष नजरजिल्ह्यात ३७ केंदे्र पोलिसांच्या दृष्टीने क्रिटिकल आहेत. या ठिकाणी मतदारांकडे मतदार ओळखपत्रांचे प्रमाण कमी आहे तसेच एकल मतदारसंख्या जास्त आहे. पोलिसांच्या सूचनेनुसार यापूर्वी राजकीय तणावाचे प्रकार येथे घडले आहेत. अशा ठिकाणी मायक्रो ऑब्झर्व्हर नियुक्त करण्यात आलेले आहेत. अतिरिक्त पोलीस बंदोबस्त व वेब कास्टिंग आदी साधनांद्वारे या ठिकाणी आयोगाची नजर राहणार आहे.थेट प्रक्षेपणात आवाजही राहणारमाहितीनुसार, वेब कास्टिंग असणाºया मतदान केंद्रांमध्ये पेनसदृश तीन मेगापिक्सल कॅमेरा भिंतीला लावला जाणार आहे.या कॅमेºायद्वारे किमान २० फुटांपर्यंतचा आवाजही ऐकू येणार आहे.

टॅग्स :amravati-acअमरावती