Maharashtra Election 2019 ; वैयक्तिक टीकेचे उत्तर विजयाने देणार - वीरेंद्र जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 06:00 AM2019-10-19T06:00:00+5:302019-10-19T06:01:03+5:30

मतदारसंघातील तिवरा, आसेगाव, जळका पटाचे, वाढोणा गा., शेंदूरजना खुर्द, तळेगाव, जुना धामणगाव, मंगरूळ दस्तगीर येथे वीरेंद्र जगताप यांची प्रचार पदयात्रा झाली. याप्रसंगी महाआघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. विरोधी पक्षाकडून प्रचाराच्या पुढील टप्प्यात अपप्रचार केला जाईल. कारण त्यांच्याकडे विकासाचे व्हिजन नाही. जाती-धर्माच्या नावावर मत मागितले जातील, असा आरोप आ. जगताप यांनी केला.

Maharashtra Election 2019 ; Vijayendra Jagtap will answer personal remarks with victory | Maharashtra Election 2019 ; वैयक्तिक टीकेचे उत्तर विजयाने देणार - वीरेंद्र जगताप

Maharashtra Election 2019 ; वैयक्तिक टीकेचे उत्तर विजयाने देणार - वीरेंद्र जगताप

Next
ठळक मुद्देविरोधकांकडे नाही विकासाचे व्हिजन : मतदारसंघात प्रचारदौरा

चांदूर रेल्वे : धामणगाव रेल्वे आणि चांदूर रेल्वे येथे सभा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी माझ्याविषयी बोलले. त्यांच्या टीकेचे उत्तर मी विधानसभा निवडणुकीतील विजयाने देणार, असा दावा धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार वीरेंद्र जगताप यांनी केला.
मतदारसंघातील तिवरा, आसेगाव, जळका पटाचे, वाढोणा गा., शेंदूरजना खुर्द, तळेगाव, जुना धामणगाव, मंगरूळ दस्तगीर येथे वीरेंद्र जगताप यांची प्रचार पदयात्रा झाली. याप्रसंगी महाआघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. विरोधी पक्षाकडून प्रचाराच्या पुढील टप्प्यात अपप्रचार केला जाईल. कारण त्यांच्याकडे विकासाचे व्हिजन नाही. जाती-धर्माच्या नावावर मत मागितले जातील, असा आरोप आ. जगताप यांनी केला. शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारसरणीचे व संविधानाला मानणारे आपण लोक आहोत. तेव्हा भूलथापांपासून आपण सावध राहायला हवे, असे आवाहन वीरेंद्र जगताप यांनी केले. कार्यक्रमाला मुन्ना पनपालिया, चौधरी, अविनाश वानखडे, किशोर कांबळे, माणिक मडावी, रमेश शेंडे, मनोहर तलमले, शरद अवचार, पराग राऊत, प्रवीण गायकवाड, सचिन समोसे, डॉ. विनोद देशमुख, अनिता मेश्राम, दिवाकर ठाकरे, सचिन रामगावकर, संजय तायडे, बाळू तायडे, विजू बोरकर, सुरेश निमकर, रवि भुतडा, सतीश हजारे, राजू डाफ, प्रमोद गुल्हाने आदी उपस्थित होते.

Web Title: Maharashtra Election 2019 ; Vijayendra Jagtap will answer personal remarks with victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.