शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

Maharashtra Election 2019 ; पोलिसांचे 'मिशन विधानसभा' यशस्वी; स्ट्राँग रूमवर कडेकोट पहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 6:00 AM

लोकसभा निवडणुकीनंतर गणेशोत्सव, दुर्गात्सव व विधानसभा निवडणुकीच्या क्रमात कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागले नाही. त्यात विधानसभा ही पोलिसांसाठी अग्निपरीक्षाच होती. लोकसभेच्या वेळी पोलिसांनी पूर्वतयारी केली होती, गुन्हेगारांविरुद्ध कारवाईचा सपाटा सुरू केला होता. प्रतिबंधात्मक कारवाई, तडीपारी, एमपीडीए, रेकॉर्डवरील आरोपींची धरपकड, कोम्बिंग ऑपरेशन, फिक्स पॉइंट, पेट्रोलिंग अशा पद्धतीचे नियोजन पोलिसांचे होते.

ठळक मुद्देशहर-ग्रामीण भागात कायदा-सुव्यवस्था अबाधित : नियोजनबद्ध पोलिसिंगमुळे शांततेत निवडणूक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांची शिस्तशीर कार्यप्रणाली ‘मिशन विधानसभा’ यशस्वी करून गेली. शहर पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर व जिल्हा पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. यांच्या नियोजनबद्ध पोलिसिंगमुळे विधानसभा शांततेत पार पडली.लोकसभा निवडणुकीनंतर गणेशोत्सव, दुर्गात्सव व विधानसभा निवडणुकीच्या क्रमात कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागले नाही. त्यात विधानसभा ही पोलिसांसाठी अग्निपरीक्षाच होती. लोकसभेच्या वेळी पोलिसांनी पूर्वतयारी केली होती, गुन्हेगारांविरुद्ध कारवाईचा सपाटा सुरू केला होता. प्रतिबंधात्मक कारवाई, तडीपारी, एमपीडीए, रेकॉर्डवरील आरोपींची धरपकड, कोम्बिंग ऑपरेशन, फिक्स पॉइंट, पेट्रोलिंग अशा पद्धतीचे नियोजन पोलिसांचे होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कुठल्याही अप्रिय घटना घडली नाही. मध्यंतरी अचलपुरात तिहेरी हत्याकांड घडले. मात्र, पोलीस अधीक्षकांनी स्वत: उपस्थित राहून तेथील तणावाची स्थिती हाताळली. परिणामी विधानसभा निवडणुकीत तेथे कुठलाही अनुचित प्रकार घडू दिला नाही.पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी निवडणूक प्रक्रियेत प्रचंड व तडगा बंदोबस्त लावून आव्हान पेलले. मतमोजणीच्या वेळी स्ट्राँग रूमच्या खड्या पहाऱ्याने त्याची चुणूक दिली. याशिवाय निकालाच्या दिवशी अमरावती शहरातील सर्व उमेदवारांचे निवासस्थान व कार्यालयांना सकाळपासून चोख बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली होती.विजयी मिरवणुकीला कवचविधानसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघातून सुलभा खोडके, तर बडनेरा मतदारसंघातून रवि राणा यांनी विजयाची पताका उंचावली. मतमोजणीदरम्यान खोडके व रवि राणा यांचे समर्थक व कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला होता. जल्लोषात कुठल्याही प्रकारे व्यत्यय येऊ नये, याकरिता पोलिसांनी सुरक्षा प्रदान केली. दोन्ही विजयी उमेदवारांच्या घरी व कार्यालयात उत्साह दाटून आलेल्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. त्यांनाही सुरक्षा कवच पोलिसांनी पुरविले.

टॅग्स :amravati-acअमरावती