शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

Maharashtra Election 2019 ; राणांचा बडनेऱ्यात नवा विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 06:00 IST

२००९ ते २०१९ या निवडणुकांमध्ये रवि राणा यांना विजय खेचून आणता आला. त्यावेळीही निवडणूक कठीण होती; परंतु राणांनी ती जिंकली. यावेळी प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेनेच्या प्रीती बंड होत्या. मुद्दा भावनिकतेकडे वळल्यामुळे राणा यांची यावेळी कसोटी होती. संयमाने नियोजन, आखणी करण्याचे कौशल्य अंगी बाळगून असलेल्या राणांनी यावेळच्या आगळ्या समस्येवरही चाणाक्षपणे मात केली.

ठळक मुद्दे‘हॅटट्रिक’ साधली : विजयात खासदार पत्नीचाही मोलाचा वाटा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बडनेरा विधानसभा मतदारसंघात तिसऱ्यांदा विजयी झालेले अपक्ष आमदार रवि राणा यांनी नव्या विक्रमाची नोंद केली आहे. बडनेºयात यापूर्वी कुणीही सलग दोनपेक्षा अधिक वेळा निवडून आलेले नव्हते. राणांनी हा शिरस्ता मोडून विक्रम प्रस्थापित केला. त्यांनी शिवसेनेच्या प्रीती बंड यांचा १५५४१ मतांनी पराभव केला.२००९ ते २०१९ या निवडणुकांमध्ये रवि राणा यांना विजय खेचून आणता आला. त्यावेळीही निवडणूक कठीण होती; परंतु राणांनी ती जिंकली. यावेळी प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेनेच्या प्रीती बंड होत्या. मुद्दा भावनिकतेकडे वळल्यामुळे राणा यांची यावेळी कसोटी होती. संयमाने नियोजन, आखणी करण्याचे कौशल्य अंगी बाळगून असलेल्या राणांनी यावेळच्या आगळ्या समस्येवरही चाणाक्षपणे मात केली. १५५४१ मतांची आघाडी घेत विजयश्री खेचून आणला.खासदार पत्नीचाही विजयात वाटाआमदार रवि राणा यांना यावेळची निवडणूक सावधपणे लढावी लागेल, अशी चर्चा सर्वत्र असताना, निवडणुकीच्या दोन महिन्यांपूर्वीच त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनी 'रवि भैया को बीस हजार वोटों से जित के लाना ये मेरी जिम्मेदारी हैं' अशा शब्दांत ‘लोकमत’शी बोलताना जबाबदारी स्वीकारली होती. यावेळी निश्चित नियोजनानुसार पहिल्यांदा रवि राणा यांनी आणि त्यानंतर अखेरच्या टप्प्यात खासदार नवनीत राणा यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. विजयामागे रवि राणा यांचे निवडणूक लढण्याचे कौशल्य असले तरी पत्नी नवनीत यांचाही मोठा सहभाग आहे.राणा दाम्पत्य झाले आमदार-खासदारखासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा या दाम्पत्याने सन २०१९ मध्ये सहा महिन्यांच्या अवधीत झालेल्या अनुक्रमे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून विजय खेचून आणला आहे. एकाच कालावधीत आमदार-खासदार होणारे राणा दाम्पत्य एकमेव ठरले आहे. एकाचवेळी आमदार, खासदार होण्याचा बहुमान राणा दाम्पत्याला मिळाला आहे. यापूर्वी शेखावत कुटुंबात देवीसिंह शेखावत यांना आमदार, तर माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना खासदार होता आले. मात्र, हे काही वर्षांच्या अंतराने हे साध्य झाले. एकाच घरात आमदार-खासदार शेखावत दाम्पत्यानंतर राणा दाम्पत्याला होता आले, हे विशेष.

टॅग्स :amravati-acअमरावती