शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; मुख्यमंत्री माझ्यासोबत - रवि राणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 06:00 IST

४ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राजापेठ चौकातील सभेतून मुख्यमंत्र्यांनी माझ्या मतदारसंघात सभा घेऊन दाखवावी किंवा माझ्याविरुद्ध बोलून दाखवावे, असे जाहीर आव्हान दिले होते, असे राणा यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी अमरावतीच्या प्रचार सभेत माझ्याविरुद्ध टीका करावी, यासाठी शिवसेनेच्या मंडळींनी शक्य ते सर्व प्रयत्न केलेत.

ठळक मुद्देबडनेरा : बारीपुरा येथील जाहीर सभेत वक्तव्य, खासदारांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ अमरावतीत आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याविरुद्ध शब्दही उच्चारला नाही. त्यामुळे त्यांनी न बोलताच मला पाठिंबा दिला, असा दावा करीत मुख्यमंत्री हे माझे चांगले मित्र असून, ते माझ्यासोबतच आहेत, असे वक्तव्य बडनेऱ्याचे अपक्ष आमदार रवि राणा यांनी बुधवारी बडनेराच्या जुनीवस्तीतील बारीपुरा येथे आयोजित जाहीर प्रचार सभेत केले.बारीपुरा येथे खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. रवि राणा म्हणाले की, मागील पाच वर्षांत मुख्यमंत्र्यांनी माझ्या कार्यशैलीचा अनुभव घेतला आहे. मी अपक्षांच्यावतीने फडणवीस सरकारला पाठिंबाही जाहीर केला होता. पाच वर्षांत मुख्यमंत्र्यांनी बडनेरा मतदारसंघातील विकासकामांसाठी भरीव निधी दिला. माझ्यासारखा आमदार विधानसभेत असावा, ही मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे. त्यामुळेच अमरावती येथील नेहरू मैदानावर बुधवारी महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याविरुद्ध शब्दही उच्चारला नाही. न बोलता त्यांचा मला पाठिंबा आहे. मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षरीत्या दिलेला हा संदेश असल्याचा दावा राणा यांनी केला आहे.४ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राजापेठ चौकातील सभेतून मुख्यमंत्र्यांनी माझ्या मतदारसंघात सभा घेऊन दाखवावी किंवा माझ्याविरुद्ध बोलून दाखवावे, असे जाहीर आव्हान दिले होते, असे राणा यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी अमरावतीच्या प्रचार सभेत माझ्याविरुद्ध टीका करावी, यासाठी शिवसेनेच्या मंडळींनी शक्य ते सर्व प्रयत्न केलेत. मी दिलेल्या आव्हानाचा हवाला देऊन, मुख्यमंत्र्यांनी तसे वक्तव्य करणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोपही राणा यांनी केला. माझे मित्र असलेल्या मुख्यमंत्र्यांनी अमरावती येथे आल्यानंतर महायुतीच्या प्रचार सभेत ना माझ्या नावाचा उल्लेख केला, ना माझ्याविरुद्ध प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष टीका केली. मुख्यमंत्री माझ्यासोबत आहेत, हेच यातून पुन्हा एकदा सिद्ध झाले, असा दावा रवि राणा यांनी जाहीर सभेतून केला.

टॅग्स :Ravi Ranaरवी राणा