शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
3
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
4
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
5
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
6
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
7
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
8
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
9
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
10
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
11
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
12
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
13
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
14
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
15
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
16
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
17
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
18
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

Maharashtra Assembly Election 2019 (18062) - युतीला रोखण्यासाठी आघाडीची रणनीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 06:00 IST

जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघांपैकी चार ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. दोन ठिकाणी काँग्रेस व दोन अपक्ष आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर राजकीय पक्षांना भोपळाही फोडता आलेला नाही. युती होत असल्याने शिवसेनेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. आघाडीतही मनोमीलन झाल्याने नव्या दमाने काँग्रेस अन् राष्ट्रवादी काँग्रेस रिंगणात उतरले आहेत.

ठळक मुद्देरणांगण विधानसभेचे : यशोमती ठाकूर, बच्चू कडू, वीरेंद्र जगताप पुन्हा मैदानात, अमरावतीबाबत औत्सुक्य!

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सलग तीनवेळा आमदारकी मिळवू शकलेले धामणगाव रेल्वेचे वीरेंद्र जगताप आणि अचलपूरचे बच्चू कडू हे दोन्ही अनुभवी नेते आपापल्या मतदारसंघातून पुन्हा रिंगणात उतरले आहेत.तिवस्याच्या आमदार यशोमती ठाकूर, बडनेराचे आमदार रवि राणा, मोर्शीचे आमदार अनिल बोंडे यांना सलग दोनदा निवडणूक जिंकता आली. आता तिसऱ्यांदा तिघेही मैदानात आहेत. तत्कालीन पालकमंत्री सुनील देशमुख हे अमरावतीतून पुन्हा रिंगणात राहतील.मोदी लाटेत पहिल्यांदाच निवडून आलेले मेळघाटचे आमदार प्रभुदास भिलावेकर व दर्यापूरचे आमदार रमेश बुंदिले यांनाही दुसऱ्यांदा निवडणूक लढायची आहे.यावेळी तिवसा, धामणगाव रेल्वे, अचलपूर, दर्यापूर व मोर्शी हे मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला राहणार असल्याची माहिती आहे. तिवसा मतदारसंघात यशोमती ठाकूर व चांदूर रेल्वे मतदारसंघात वीरेंद्र जगताप यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. सर्वाधिक गहजब अमरावती मतदारसंघात आहे. 'स्टँडबाय मोड’वर असलेले माजी आमदार रावसाहेब शेखावत केव्हाही चुप्पी तोडून खळबळ उडवू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार सुलभा खोडके यांच्या उमेदवारीच्या घोषणेने वातावरण तापले आहे.याशिवाय मोर्शी मतदारसंघातही माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख ऐनवेळी उमेदवारीसाठी दावा करतील, अशी शक्यता अनेकांना वाटते. मेळघाटमध्ये माजी आमदार राजकुमार पटेल यांनी राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये प्रवेश केल्याने त्यांच्यासाठी उमेदवारी मागितली जाऊ शकते. काँग्रेसचे माजी आमदार केवलराम काळे भाजपवासी व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अनुभवी आमदारांना सतर्कतेची यावेळी गरज निर्माण झाली आहे. वंचित बहुजन आघाडी व एमआयएम यांच्यात युतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. बसपा व डाव्या आघाडीचे उमेदवारही दखलपात्र मते घेणार आहेत.जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघांपैकी चार ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. दोन ठिकाणी काँग्रेस व दोन अपक्ष आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर राजकीय पक्षांना भोपळाही फोडता आलेला नाही. युती होत असल्याने शिवसेनेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. आघाडीतही मनोमीलन झाल्याने नव्या दमाने काँग्रेस अन् राष्ट्रवादी काँग्रेस रिंगणात उतरले आहेत. भाजपच्या उधळलेल्या वारूला लगाम घालण्यासाठी विरोधकांनी आतापासूनच शक्ती पणाला लावली आहे.पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा पणालापालकमंत्र्यांनी जिल्हाभरातील भाजपच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी झटणे अपेक्षित आहे; तथापि मतदारसंघात स्थिती अटीतटीची असल्यामुळे पालकमंत्री वरूड, मोर्शीतच अडकून पडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे हर्षवर्धन देशमुख, काँग्रेसचे विक्रम ठाकरे व शेतकरी स्वाभिमानी पक्षाचे देवेंद्र भुयार यांच्यामुळे बोंडे यांचे श्रम वाढले आहेत. कृषिमंत्रिपद मिळाल्यावरही शेतकºयांना, संत्राउत्पादकांना आलेली निराशा, ड्रायझोनचा बिकट झालेला मुद्दा आणि बोंडे यांचे अमरावतीकर असणे या मुद्यांवर आतापासूनच उडू लागलेला धुराळा कृषिमंत्री कसा शमवितात, हे बघणे जिल्हावासीयांसाठी रंजक ठरणार आहे.भाजपचा चंग, यशोमतींचा निर्धार!आमदार यशोमती ठाकूर यांच्याकडे आता प्रदेश कार्याध्यक्षपदाची जबाबदारी आहे. तिवसा मतदारसंघासोबतच काँग्रेस पक्षाला उभारी देण्याची जबाबदारीही त्यांच्यावर आली आहे. यशोमतींना रोखायचेच हा भाजपने बांधलेला चंग आणि लढायचे ते जिंकण्यासाठीच हा यशोमतींचा निर्धार निवडणुकीत रंगत आणणारा आहे.एकाच कुटुंबात दोन आमदार?पराभवाची हॅट्ट्रिक झाल्यानंतर अरुण अडसड यांना विधान परिषदेत आमदार करण्यात आले. नव्या चेहºयाला संधी देण्याऐवजी अडसडांना पुत्रपे्रमाचे भरते आल्यामुळे एकाच घरात दोन आमदार का असावे, असा सवाल आता भाजप कार्यकर्ते उघडपणे करू लागले आहेत.खासदार अन् आमदारबडनेरा मतदारसंघाचे दोन वेळा रवि राणा यांनी प्रतिनिधित्व केले आहे. तिसºयांदा पुन्हा ते उमेदवार आहेत. त्यांच्या पत्नी नवनीत राणा या आता अमरावतीच्या खासदार आहेत. एकाच घरात खासदार आणि आमदार असावे काय, या मुद्यावरून चर्चा रंगू लागल्या आहेत. विशेष असे की, आनंदराव अडसुळांनी मुलाला आमदार केल्याच्या मुद्यावरून राणा दाम्पत्याने लोकसभेच्या प्रचारात रान उठविले होते. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019