शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

महाबीजला दणका नव्याने देणार बियाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 05:01 IST

जिल्ह्यात महाबीजसह काही खासगी बियाणे कंपन्यांद्वारे उगवणशक्ती नसलेले सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्याने खरीप हंगामात शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. जिल्ह्यात १५ तारखेपर्यंत किमान ५०० शेतकऱ्यांचे पाच कोटींपर्यंतचे नुकसान झाल्याचे वृत्त ‘लोकमत’द्वारे जनदरबारात मांडल्याची गंभीर दखल कृषिमंत्र्यांनी घेतली. यासंदर्भात अकोला स्थित महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना कृषी विभागाचे अवर सचिव उमेश चांदीवडे यांना पत्र दिले.

ठळक मुद्देशासनाची दखल : सोयाबीनची उगवण नसल्याने शेतकऱ्यांच्या तक्रारी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाबीजच्या काही लॉटमधील सोयाबीन बियाण्यांची उगवण नसल्याची तक्रार असलेल्या शेतकऱ्यांना परत बियाणे मिळणार आहे. शासनाने तसे आदेश महाबीजला दिले आहेत. बियाण्यांचा स्टॉक संपल्यास त्यांना धनादेश देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा व्यवस्थापकांनी दिली. याविषयी धोरण ठरविण्यात येणार आहे. यासंदर्भात महाबीजचे प्रादेशिक व्यवस्थापक बुधवारी जिल्ह्यात दाखल झाले.जिल्ह्यात महाबीजसह काही खासगी बियाणे कंपन्यांद्वारे उगवणशक्ती नसलेले सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्याने खरीप हंगामात शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. जिल्ह्यात १५ तारखेपर्यंत किमान ५०० शेतकऱ्यांचे पाच कोटींपर्यंतचे नुकसान झाल्याचे वृत्त ‘लोकमत’द्वारे जनदरबारात मांडल्याची गंभीर दखल कृषिमंत्र्यांनी घेतली. यासंदर्भात अकोला स्थित महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना कृषी विभागाचे अवर सचिव उमेश चांदीवडे यांना पत्र दिले. महाबीज बियाणेसंदर्भात ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत, त्याची तत्काळ दखल घेऊन तालुकास्तरीय समितीच्या अहवालाची वाट न पाहता, बियाणे बदलून देण्याची कार्यवाही त्वरित सुरू करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे. उगवणशक्ती नसलेल्या बियाण्यांचा परतावा सोयाबीन बियाण्यांद्वारे देण्यात येण्यात येणार आहे. अकोला, वाशिम, हिंगोली येथील महाबीजच्या गोदामात असलेले बियाणे या ठिकाणी मागविण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. शेतकऱ्यांनी जेथून खरेदी केले, तेथेच द्यायचे की कसे, याविषयी उपलब्ध बियाणे व तक्रारी याची सांगड घालण्यात येऊन धोरण ठरविण्यात येत आहे. उपलब्ध बियाणे संपल्यानंतर धनादेशाद्वारे रक्कम देण्यात येण्यात असल्याची माहिती महाबीजद्वारे देण्यात आली.कॉमन लॉटमध्ये तक्रारी जास्तमहाबीजच्या कॉमन लॉटमध्ये उगवणशक्तीच्या तक्रारी जास्त आहेत व हे सर्व बियाणे विकले गेले आहेत. महाबीजच्या जे-३३५ मध्ये ६०२४ व २५२ या लॉटमध्ये व ९५२३ मध्ये ५९ व ५ या लॉटमध्ये उगवणशक्ती नसल्याच्या तक्रारी जास्त आहेत. नांदगाव खंडेश्वर व मोर्शी तालुक्यात २५२ लॉटमधील बियाणे विकले गेले, तर चांदूर बाजार तालुक्यात ५९ व ५ या लॉटमधील बियाणे विकले गेले. याव्यतिरिक्त आणखी चार ते पाच लॉटसाठी मंजुरी घेण्यात येणार असल्याचे जिल्हा व्यवस्थापकांनी सांगितले.प्रमाणीकरणानंतर बियाणे खराब का?राज्य शासनाद्वारे बियाण्यांचे प्रमाणीकरण करण्यात आलेले असताना, उगवणशक्ती का नाही की यामध्येही घोळ आहे, असा शेतकºयांचा सवाल आहे. लॉट पासिंग करताना बियाणे ओले असल्याचीच शक्यता आहे. त्यामुळे फंगस चढल्याने उगवणशक्ती कमी झाली. याव्यतिरिक्त आणखी काही कारणेदेखील आहेत. बियाणे राज्य शासनाच्या एजन्सीद्वारे प्रमाणित करण्यात आल्यानंतरच महाबीजद्वारे विक्री करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या बियाण्यांची पेरणी झाल्यानंतर उगवणशक्ती नसल्याची बाब उघड झाली आहे.उगवण न झालेल्या काही लॉटमधील सोयाबीन बियाण्यांबाबत तक्रारदार शेतकºयांना परत बियाणे देण्यात येणार आहे. बियाणे उपलब्ध न झाल्यास धनादेश देण्यात येतील. याविषयी शासनाचे पत्र प्राप्त आहे.- एस.पी. देशमुख, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज

टॅग्स :Mahabeejमहाबीज