शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

मेळघाटात मग्रारोहयोची कामे; स्थलांतर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 05:00 IST

मेळघाटात कोरडवाहू आणि डोंगरी शेतजमीन असल्याने आदिवासी शेतकरी कसेतरी त्यातून एक पीक घेतात. यंदा मात्र सोयाबीन मोठ्या प्रमाणात कुजल्याने नुकसान झाले. त्यामुळे येथील आदिवासी मजूर महिनाभरापासून अमरावती, अकोला, नागपूर, यवतमाळ अशा विविध जिल्ह्यांमध्ये सोयाबीन कापणी व मिळेल त्या रोजंदारीच्या कामासाठी स्थलांतरित झाले आहेत. पूर्वी दोनशे रुपये क्विंटलप्रमाणे मिळणारा कापणीचा दर आता १३०० ते १६०० रुपये क्विंटलपर्यंत दिला जात आहे.

ठळक मुद्देफसवणूक, अपघात : आदिवासी मजूर पठारावरील भागांमध्ये जुंपले सोयाबीन कापणीला

नरेंद्र जावरेलोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा/चिखलदरा : मेळघाटातील डोंगरी भागातून सोयाबीन कापण्यासाठी हजारो आदिवासी मजूर जिल्ह्याच्या पठारी भागात स्थलांतरित झाले आहेत. मेळघाटात डिसेंबर महिन्यांपर्यंत मग्रारोहयो अंतर्गत कामांचे नियोजन असताना, हजारोंच्या संख्येने झालेल्या स्थलांतरात फसवणूक आणि अपघाताचे प्रकार आता वाढू लागले आहेत.मेळघाटात कोरडवाहू आणि डोंगरी शेतजमीन असल्याने आदिवासी शेतकरी कसेतरी त्यातून एक पीक घेतात. यंदा मात्र सोयाबीन मोठ्या प्रमाणात कुजल्याने नुकसान झाले. त्यामुळे येथील आदिवासी मजूर महिनाभरापासून अमरावती, अकोला, नागपूर, यवतमाळ अशा विविध जिल्ह्यांमध्ये सोयाबीन कापणी व मिळेल त्या रोजंदारीच्या कामासाठी स्थलांतरित झाले आहेत. पूर्वी दोनशे रुपये क्विंटलप्रमाणे मिळणारा कापणीचा दर आता १३०० ते १६०० रुपये क्विंटलपर्यंत दिला जात आहे. शेतजमीन किती एकर आहे, हे आदिवासींना समजत नसल्याने काही जण कमी शेतजमीन सांगून फसवणूक करतात. मजुरीचे काम देणारा दला एकरामागे १०० ते २०० रुपये कापून घेतो. परजिल्ह्यात रात्रंदिवस काम करूनही मजुरी न देता हाकलून लावून दिल्याचेही प्रकार आदिवासींसोबत मोठ्या प्रमाणात घडत आहेत. दुसरीकडे अपघातात जीव गमवावा लागत असल्याचे प्रकार वाढले आहेत.डिसेंबरपर्यंत मग्रारोहयोच्या कामाचा शेल्फमेळघाटातील आदिवासी मजूर स्थलांतरित होऊ नये, त्यांना गावातच कामे मिळावी, यासाठी महसूल व पंचायत समितीच्यावतीने मोठ्या प्रमाणात कामे उघडण्यात आली आहेत. डिसेंबरपर्यंत कामाचा ह्यशेल्फह्ण तयार करण्यात आला असल्याची माहिती चिखलदऱ्याच्या तहसीलदार माया माने यांनी दिली. तालुक्यातील गावांमध्ये कामाची मागणी होताच मग्रारोहयो अंतर्गत कामे सुरू केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.अचलपूर तालुक्यात सोयाबीनचे पीक पावसामुळे कुजले. असदपूर व परिसरात दरवर्षीप्रमाणे मेळघाटातील आदिवासींकडून प्रतिएकर दराने कापणी करवून घेतली जात आहे.- प्रवीण साबळेशेतकरी, असदपूर

टॅग्स :Melghatमेळघाट