शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

मदरशाची झडती, पीडितेच्या मैत्रिणींचे नोंदविले बयाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 06:00 IST

लालखडी रिंगरोडवरील जामियानगर स्थित जामिया इस्लामिया बुस्तान-ए-फातेमा लिल्बनात नावाच्या मदरशात शिक्षण घेणाºया एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली. पीडिताच्या वडिलांच्या तक्रारीवरून नागपुरी गेट पोलिसांनी मदरसा संस्थाध्यक्ष मुफ्ती जियाउल्ला खान व फिरदौस नामक तेथील महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविला.

ठळक मुद्देमुफ्ती जियाउल्ला खानसह फिरदौस पसार : आरोपीच्या शोधात पोलीस नागपुरात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मदरशात राहून शिक्षण घेणाऱ्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी मुफ्ती जियाउल्ला खान व फिरदौस नामक महिला पसार झाली आहे. पोलिसांकडून युद्धपातळीवर दोघांचाही शोध घेतला जात आहे. यादरम्यान मंगळवारी पोलिसांनी पीडित मुलीच्या दोन मैत्रिणींचे बयाण नोंदविले. पोलिसांनी सरकारी पंचासमक्ष घटनास्थळाचा पंचनामा करून मदरशाची झडती घेतली.लालखडी रिंगरोडवरील जामियानगर स्थित जामिया इस्लामिया बुस्तान-ए-फातेमा लिल्बनात नावाच्या मदरशात शिक्षण घेणाºया एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली. पीडिताच्या वडिलांच्या तक्रारीवरून नागपुरी गेट पोलिसांनी मदरसा संस्थाध्यक्ष मुफ्ती जियाउल्ला खान व फिरदौस नामक तेथील महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविला. पोलीस पथक दोन्ही आरोपींना अटक करण्यासाठी गेले असता, ते दोघेही पसार झाल्याचे निदर्शनास आले.दरम्यान, पोलिसांनी मदरशातील घटनास्थळ व कार्यालय सील केले. मदरशातील मुलींना मुफ्ती जियाउल्ला खानने १८ नोव्हेंबरपर्यंत सुट्टी दिल्याची बाब चौकशीत पुढे आली. सोमवारी रात्री मुफ्ती जियाउल्ला खान व त्याचा चालकाचे लोकेशन मोझरीनजीक होते. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक मोझरी गेले. मात्र, तेथून तो पसार झाला. पोलीस रित्या हाताने परतले. त्यानंतर जियाउल्ला खानचे लोकेशन पोलिसांना मिळालेले नाही. पोलीस जियाउल्ला खानच्या हातखेडा येथील निवासस्थानी गेले; तेथेही तो नव्हता. तो जिल्हाबाहेर पसार झाल्याची माहिती पुढे आली असून, त्या अनुषंगाने सर्व पोलीस यंत्रणांना माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणात मदरशातील मुलींचे बयाण नोंदविण्यासाठी बाल कल्याण समिती व चाइल्ड लाइनची मदत घेण्यात येत आहे.मुफ्ती जियाउल्ला खानच्या निवासस्थानी धडकले नागरिकजियाउल्ला खान याच्या लालखडी परिसरातील निवासस्थानी सोमवारी रात्री शेकडो नागरिक धडक ले. यादरम्यान काही नागरिकांनी दगडफेक केल्याचीही चर्चा आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांचा ताफा जियाउल्ला खानच्या निवासस्थानी पोहोचला. त्यानंतर तणावाची स्थिती निवळली.२४ सप्टेंबरच्या रात्री पीडितासाठी भयावह२४ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास मदरशातील फिरदौस नामक महिलेने पीडित मुलीला मुफ्ती जियाउल्ला खानच्या खोलीत नेले. त्यानंतर पहाटे ४ वाजता पीडित मुलीला खोलीतून बाहेर आणले गेले. ती रात्र पीडित मुलीसाठी भयावह ठरली.मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील दोन्ही आरोपी पसार झाले. पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे. सरकारी पंचांसमक्ष घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, मदरशाची झडती घेण्यात आली आहे. याशिवाय पीडिताच्या दोन मैत्रिणींचे बयाण नोंदविले आहे.- अर्जुन ठोसरे, पोलीस निरीक्षक, नागपुरी गेट.

टॅग्स :Rapeबलात्कार