बडनेरा स्थानकावरून आणले परत : बालकाने लिहिली सुसाईड नोटअमरावती : १२ वर्षांच्या बालकाने वर्गातील मुलीला प्रेमपत्र लिहिले, वर्गशिक्षकाने वडिलांना बोलावितो, अशी ताकीद दिल्यानंतर काही वेळानंतर तो बालक सुसाईड नोट लिहून तेथून निघून गेला. हा खळबळजनक प्रकार शहरातील एका नामांकीत शाळेतील एका १२ वर्षीय बालकाने केल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. त्या बालकासाठी पोलिसांनी संपूर्ण शहर हुडकून काढले. अखेर त्या बालकाला पोलिसांनी बडनेरा रेल्वे स्थानकावरुन ताब्यात घेतले. राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेला १२ वर्षिय बालक शहराच्या मध्यवस्तीमधील शाळेत सहाव्या वर्गात शिकतो. दररोजप्रमाणे गुरुवारी तो शाळेत गेला. त्याला आवडलेल्या एका मुलीला त्याने दुपारी दीड वाजता प्रेमपत्र दिले. त्या मुलीने त्याचे प्रेमपत्र शाळेतील शिक्षकाला दाखविले. त्यांनी बालकाला प्रेमाने समजावून सांगितल्यानंतर शिक्षा म्हणून वडिलांना बोलाविण्यास सांगितले. त्यांनीही वडिलांशी फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क झाला नाही. काही वेळानंतर शाळा सुटताच त्या बालकाला शाळकरी व्हॅन घेण्यासाठी आली. मात्र, तो शाळेत नसल्याचे व्हॅन चालकाला कळले. व्हॅन चालकाने शाळेतील शिक्षकांना विचारपूस केली. त्यावेळी तो बालक शाळेतून निघून गेल्याचे शिक्षकांना कळले. त्यांनी याबाबत बालकांच्या आई-वडिलांना कळविले. दरम्यान शाळेतच त्या बालकाने लिहीलेली सुसाईड नोट सापडली. 'मला देशसेवा करायची आहे. पण मी ती करू शकत नाही. त्यामुळे मी शहीद व्हायला जात आहे. काका, मामा व मित्रांनी श्रध्दाजंलीसाठी तयार रहावे' असे त्याने लिहिले. याप्रकाराने एकच खळबळ उडाली. शिक्षकांनी ही माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांना दिली. त्यांनी तत्काळ सूत्रे हलवून सर्व पोलीस ठाण्यांना माहिती दिली. पोलिसांनी शहरात नाकाबंदी करून बालकाचा शोध घेण्यास सुरूवात केली. रेल्वे स्थानक, सार्वजनिक विहिरी, बसस्थानके आदी ठिकाणी शोध घेतल्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता तो बडनेरा रेल्वे स्थानकावर रेल्वेत चढताना आढळून आला. रेल्वे पोलीस व सिआर मोबाईलमधील पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन शहर कोतवाली पोलिसांच्या स्वाधिन केले.शाळकरी मुलगा रागाच्या भरात शाळेतून निघून गेला होता. त्याने सुसाईड नोट लिहिल्यामुळे तत्काळ त्याचा शोध घेण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली. शहरातील सर्वच भागात पोलिसांनी त्याचा शोध घेतला. अखेर तो बालक बडनेरा रेल्वेस्थानकावर रेल्वेत बसताना आढळून आला. त्याला आई-वडिलांच्या स्वाधीन केले आहे. - दिलीप पाटील, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा.वडील आर्मीत असल्याने शहीद होण्यास जात होतापोलिसांनी शाळेत जाऊन बालकाने लिहिलेली सुसाईड नोट ताब्यात घेतली. त्यामध्ये लिहिलेला मजकूर वाचल्यावर पोलिसांची तारांबळ उडाली. 'मला देशसेवा करायची होती. पण मी देशसेवा करू शकणार नाही, माझ्या मित्र चांगली देशसेवा करू शकतो, मी आता शहीद होण्यासाठी जात आहे. माझ्या श्रध्दाजंलीसाठी काका, मामा व मित्रांनी तयार राहावे, असे त्या सुसाईड नोटमध्ये लिहिले होते. शहरात अचानक नाकाबंदी झाल्याने खळबळबालक शाळेतून बेपत्ता झाला आणि त्याने सुसाईड नोट लिहिल्याचे कळताच पोलिसांनी शहरातील विविध मार्गावर नाकांबदी केली. यामध्ये बहुतांश पोलीस यंत्रणा कामी लागली होती. पोलिसांनी शहरातील रेल्वेस्थानक, बसस्थानक व सार्वजनिक विहिरींचीसुध्दा तपासणी केली.
प्रेमपत्र, शिक्षा आणि 'त्याचे' ते निघून जाणे!
By admin | Updated: February 5, 2016 00:06 IST