शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमासाठी वाटेल ते; मुलीची आईविरोधात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 23:28 IST

प्रेमप्रकरणानंतर प्रेमीयुगुल विवाहबद्ध झाले, मात्र, मुलीच्या आईचा विरोध कायम होता. आईच्या विरोधाची धार पाहून मुलीने पोलीस संरक्षणाची मागणी केली तसेच आईविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.

ठळक मुद्देप्रेमीयुगुल विवाहबद्ध : पोलीस आयुक्तासमोर हजेरी

आॅनलाईन लोकमतअमरावती : प्रेमप्रकरणानंतर प्रेमीयुगुल विवाहबद्ध झाले, मात्र, मुलीच्या आईचा विरोध कायम होता. आईच्या विरोधाची धार पाहून मुलीने पोलीस संरक्षणाची मागणी केली तसेच आईविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. प्रेमासाठी वाटेल ते... करण्याची तयारी मुलीने दाखविल्याने पोलीसांनीही या प्रकरणात सामंजस्याची भूमिका घेतली आहे.२० वर्षीय मुलगी हरविल्याची तक्रार आईने दोन दिवसांपूर्वी कोतवाली पोलिसांकडे केली होती. दोन दिवस उलटून मुलगी घरी परतली नसल्याने चिंता वाढली होती. पोलीस ठाण्याच्या चकरा वाढल्या होत्या. एका तरुणाने अपहरण केल्याचे तक्रारीत नमूद करून, तुम्ही त्याला पकडून आणले नाही, तर मी आत्महत्या करेन, अशी धमकीच आईने पोलिसांना दिली. आईने थेट पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांची भेट घेऊन मुलीला परत आणण्याची विनवणी केली. आयुक्तांनी कोतवालीच्या महिला पोलीस उपनिरीक्षक सुजाता बन्सोड यांची कानउघाडणी करून प्रेमीयुगुलाला ताब्यात घेण्यासाठी सक्त निर्देश दिले. त्यानुसार कोतवाली पोलिसांनी प्रेमीयुगुलाला नागपूर येथून ताब्यात घेतले आणि अमरावतीत आणले. त्यापूर्वीच दोघे विवाहबद्ध झाले होते. शुक्रवारी प्रेमीयुगुलासह दोघांच्याही आई-वडिलांना पोलीस आयुक्तांसमोर हजर करण्यात आले होते. कुटुंबीयांचा ठाम विरोध होता. मात्र, विवाहबद्ध जोडपे सज्ञान असल्याने विवाह कायदेशीर असल्याची बाब पुढे आली. प्रेमप्रकरणातून निर्माण झालेल्या गोंधळामुळे पोलिसांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली होती.पोलीस आयुक्तालयात प्रकृती बिघडलीमुलीने लग्न केल्याचे कळताच तिच्या आईला धक्का बसला आणि आईची प्रकृती बिघडली. तत्काळ मुलीच्या आईला आॅटोरिक्षात बसवून उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले होते.दोघेही १८ वर्षांवरील असल्यामुळे त्यांचा विवाह कायदेशीर असल्याचे आढळून आले. यासंदर्भात मुलीने आईविरोधात तक्रार करून पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.- दत्तात्रय मंडलिक,पोलीस आयुक्त