शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

चार जागांवर कमळ फुलले

By admin | Updated: October 19, 2014 23:12 IST

नरेंद्र मोदींची लाट, काँग्रेसविरोधी अँटिइंकबन्सी ‘कॅश’ करण्यात भाजपला यश मिळाले आहे. गत विधानसभा निवडणुकीत खातेही न उघडणाऱ्या भाजपने अमरावती, दर्यापूर, मेळघाट व मोर्शी या चार जागा काबीज

अमरावती : नरेंद्र मोदींची लाट, काँग्रेसविरोधी अँटिइंकबन्सी ‘कॅश’ करण्यात भाजपला यश मिळाले आहे. गत विधानसभा निवडणुकीत खातेही न उघडणाऱ्या भाजपने अमरावती, दर्यापूर, मेळघाट व मोर्शी या चार जागा काबीज करुन ‘अच्छे दिन’ आल्याचे दाखवून दिले आहे. मात्र, जिल्ह्यात शिवसेना, राष्ट्रवादीला एकही जागा मिळविता आली नाही, हे विशेष.१५ आॅक्टोबर रोजी मतदान आटोपताच कोण विजयी होणार, याविषयी तर्कवितर्क लावण्यात आले. मात्र, रविवारी मतमोजणी सुरु होताच पहिल्या फेरीपासून भाजपचे उमेदवार आघाडीवर होते. एकमात्र धामणगाव रेल्वे मतदारसंघात भाजपचे अरुण अडसड आणि काँग्रेसचे वीरेंद्र जगताप यांच्यात शेवटच्या फेरीपर्यंत काट्याची लढत राहिली. अखेर जगताप यांचा ९७४ मतांनी निसटता विजय झाला. तिवसा मतदारसंघात काँग्रेसच्या यशोमती ठाकूर या विजयी झाल्यात. त्यांनी भाजपच्या निवेदिता चौधरी यांचा पराभव केला. प्रचारादरम्यान यशोमतींना विरोधकांनी लक्ष्य केले. मात्र, त्यांनी विकास कामांच्या भरवशावर दुसऱ्यांदा विजय खेचून आणला. मतदान आटोपताच काँग्रेसच्या एकमात्र यशोमती ठाकूर निवडून येतील, असा अंदाज बांधला गेला होता.युती, आघाडी संपुष्टात आल्यानंतर सर्वच पक्षाचे उमेदवार रिंगणात होते. शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही झडल्यात. मात्र शिवसेनेला एकही जागा मिळविता आली नाही. याउलट भाजपने चार जागा काबीज करुन हिंदुत्ववादी विचारसरणीची मते एकवटण्यात यश मिळविले. मोर्शी व बडनेऱ्यात शिवसेनेच्या उमेदवारांनी शेवटपर्यंत झुंज दिली. परंतु दर्यापूर, मेळघाट, धामणगाव, तिवसा, अमरावती व अचलपुरात सेनेचे उमेदवार तिसऱ्या, चवथ्या क्रमांकावर राहिलेत. गत विधानसभा निवडणुकीत खाते न उघडणाऱ्या राष्ट्रवादीला यावेळीही भोपळ्यावरच समाधान मानावे लागले. मागील निवडणुकीत दोन अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. मात्र यावेळीही बच्चू कडू, रवी राणा हे दोन्ही अपक्ष उमेदवार पुन्हा विजयी झाले आहेत. मनसेचे तिवसा, धामणगाव, दर्यापूर, मोर्शी, अचलपुरात इंजिन धावले नाही. रिपाइं (गवई गट) ने दर्यापूर, तिवसा, अचलपूर व अमरावतीत उमेदवार उभे केले. मात्र एकाही जागेवर विजय मिळविता आला नाही. बसपने जिल्ह्यात आठही जागांवर उमेदवार उभे करुन खाते उघडण्याची धडपड चालविली परंतु अपयश आले. मागील निवडणुकीपेक्षा यावेळी काँग्रेसला दोन जागांचे नुकसान झाले आहे. शिवसेनेकडे असलेली एक जागाही सांभाळता आली नाही.