शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

यंदा भरपूर आमरस; केशर १५० रुपये किलो तर हापूस ५०० रुपये डझन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:13 IST

अमरावती : मागील वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे यंदा आंब्याला चांगला मोहर आला होता. त्यामुळे यंदा भरपूर आमरस आहे. जिल्ह्यात ...

अमरावती : मागील वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे यंदा आंब्याला चांगला मोहर आला होता. त्यामुळे यंदा भरपूर आमरस आहे. जिल्ह्यात कर्नाटक, रत्नागिरीचा देवगड, गुजरात या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात आंब्यांची आवक आहे; परंतु कोरोनामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. संचारबंदीच्या कठोर निर्बंधामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होत असून, खरेदीसाठी ग्राहकही बाहेर पडत नाहीत.

यंदा रत्नगिरीचा हापूस आंबा ५०० ते ८०० रुपये डझन, तर कर्नाटकचा हापूस त्या तुलनेत २०० रुपये दराला विक्री करण्यात येत आहे. कर्नाटकचा केशर १५० रुपये, बैगपल्ली ५०, तर गुजरातचे केशर आंबे हे १०० रुपये किलो दराने विक्री करण्यात येत आहेत. मागील वर्षी यापेक्षा अधिक दर होता; परंतु यंदा उत्पादन चांगले झाल्याने आंब्याचे दर कोसळले आहेत. त्यातच कोरोनाच्या संकटामुळे सातत्याने लॉकडाऊन होत असल्याने आंबा वाहतुकीत अडथळे येत आहेत. त्यातच कोरोनामुळे ग्राहकही घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत.

आंब्याऐवजी इतर पाणीदार आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या फळांची खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. अमरावती शहरात रस्त्याच्या कडेला छोटी वाहने लावून आंब्यांची विक्री करण्यात येत आहे; परंतु दरवर्षीप्रमाणे यंदा आंबे खरेदीसाठी नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत नाही.

बॉक्स पॉईंटर

मागील वर्षीचे दर

हापूस ६०० ते १००० रुपये डझन.

बैगनपल्ली ८० ते १०० रुपये किलो.

केशर २०० रुपये किलो.

--------

बॉक्स पॉईंटर

होलसेल रिटेल किंमत

केशर : १०० ते १२०

बैगनपल्ली : ६० ते ७०

हापूस: ५०० ते ९००

बॉक्स

आवक वाढती, ग्राहक रोडावलेले

दरवर्षीपेक्षा यंदा अधिक उत्पादन झाल्याने आंब्यांची आवक वाढली आहे. अनेक व्यापारी रत्नगिरी आणि कर्नाटक येथून छोट्या वाहनांमध्ये आंबे घेऊन येत आहेत; परंतु कोरोनाच्या संकटामुळे त्या तुलनेत ग्राहकच नाहीत. दिवसाला काही पेट्याच विक्री केल्या जात आहेत. त्यात साठवणुकीचा खर्च वाढत आहे. किती दिवस आंबा साठविणार? असाही प्रश्न आहे. कारण हे फळ लवकर नाशवंत होते. त्यामुळे आंबा विक्रेत्यांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. सर्व नियमांचे पालन करून आंबा विक्री केली जात आहे; परंतु ग्राहक जवळ येण्यास कचरत आहेत. लॉकडाऊनमुळे मोजक्याच आंब्याची विक्री होत आहे.

कोट

मागील वर्षी आंब्याला चांगली मागणी होती. यंदा आंबा मोठ्या प्रमाणात आला आहे; परंतु कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. त्यामुळे खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडत नसल्याने मोठे नुकसान होत आहे. खरेदी केलेला आंबा सडून जात आहे.

- मोहम्मद युनूस, आंबा व्यापारी.

रत्नागिरी तसेच कर्नाटक येथून यंदा आंबा मोठ्या प्रमाणात खरेदी केला. वाहतूक खर्च आणि इतर मजुरीसह खूप खर्च झाला; परंतु अमरावतीत आल्यानंतर आंब्याला त्या प्रमाणात मागणी नाही आणि हवा तेवढा भावही मिळत नाही. ग्राहकही भाव तोडून मागत आहेत, त्यामुळे यंदा विक्रेत्यांचे नुकसान झाले आहे.

- प्रल्हाद देशमुख, व्यापारी.

कोट

आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत

अमरावती जिल्ह्यात दर्यापूर, अचलपूर, मेळघाटात अनेक ठिकाणी आंब्याच्या बागा आहेत. यंदा आंबा चांगला आला आहे; परंतु लग्नसराई यासह पाहुण्यांचे जाणे-येणे बंद असल्याने आंब्याला त्या प्रमाणात मागणी नाही. त्यामुळे उतरविलेल्या आंब्याचे करायचे काय?

- गणेश राठोड, काटकुंभ, शेतकरी.

दरवर्षी व्यापारी आंबा नेण्यासाठी मागे लागत होते; परंतु यंदा कोरोनामुळे मोजकेच व्यापारी खरेदीसाठी आले. त्यातही मागणी नसल्यामुळे ते भाव पाडून मागत आहेत. त्यामुळे आमचे मोठे नुकसान होत आहे.

- रामदास बचे, गौरखेडा कुंभी, शेतकरी.