शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
5
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
6
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
7
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
8
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
9
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
10
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
11
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
12
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
13
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
14
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
15
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
16
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
17
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
18
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
19
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
20
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र

११ दुकानांची राखरांगोळी कोट्यवधींची हानी

By admin | Updated: February 17, 2016 00:01 IST

शहराच्या मध्यभागी असलेल्या जयस्तंभ चौकावरील लाकुड बाजाराला मंगळवारी पहाटे ३.३० वाजता लागलेल्या आगीत अकरा दुकानांची राखरांगोळी झाली.

कारण अज्ञात : लाकूड बाजारात अग्नितांडवपरतवाडा : शहराच्या मध्यभागी असलेल्या जयस्तंभ चौकावरील लाकुड बाजाराला मंगळवारी पहाटे ३.३० वाजता लागलेल्या आगीत अकरा दुकानांची राखरांगोळी झाली. यामध्ये एक कोटींपेक्षा अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. एक काच घर व अॉटोरिक्षा पार्ट वगळता सर्व फर्निचरची दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. अचलपूर व इतर नगरपालिकांच्या अग्निशमन दलाच्या बंबांनी आगीवर नियंत्रण मिळविले. परिणामी लाकूड बाजारातील उर्वरित दुकाने बचावली. परतवाडा शहरातील अचलपूर रस्त्यावर लाकुडबाजार परिसर आहे. या परिसरात ६० पेक्षा अधिक फर्निचर, बांबू, बल्ली, लाकडांची दुकाने आहेत. मुख्य मार्गावरील या दुकानातून मंगळवारी पहाटे ३.३० वाजता आगीचे लोट उठू लागले. त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. लाकूड बाजाराच्या मागे ब्राह्मणसभा कॉलनी असल्याने आगडोंब पाहून नागरिक घाबरून गेले. अग्निशमन दल कुचकामीपरतवाडा : अयुबभाई यांच्या फर्निचर दुकानापासून लागलेली आग हमीदभाई फर्निचरपर्यंत पसरली. मागील रांगेतील अलिम फर्निचरपासून पुढची दुकाने मात्र बचावली. लाकुडबाजारात अग्नितांडव सुरू असताना अचलपूर नगरपालिकेच्या अग्निशमन वाहनात पाणीच नसल्याने पाणी भरण्यास लगेच परत गेले. घटनास्थळी उपस्थित तहसीलदार मनोज लोणारकर, ठाणेदार किरण वानखडे, नगराध्यक्ष रंगलाल नंदवंशी यांच्या मुलाने अखेर चांदूरबाजार व अंजनगाव येथून अग्निशमन वाहन बोलाविले. त्यानंतर सतत तीन वाहनांनी पाणी टाकून सकाळी १० वाजता आग आटोक्यात आणली. काचघर दुकानाची सर्वाधिक हानीमंगळवारी लागलेल्या या आगीत संजय जैन यांचे पौर्णिमा काच घराचे सर्वाधिक ७० लक्ष रुपयांपेक्षा अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आगीमध्ये वालिब फर्निचर, अशोक दुबे यांचे बल्ली व बांबू विक्री केंद्र, हनिफ फर्निचर, मुन्ना फर्निचर, अयुब फर्निचर, गाझी फर्निचर, पूजा आॅटो पार्टचे गोदाम, टीप-टॉप फर्निचर, अहफाज फर्निचर आदी दुकानांची राखरांगोळी झाली. त्यामध्ये ५० लाखापेक्षा अधिकचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पाण्याचा नळ नाहीलाकुडबाजार परिसर हा आग लागल्यावर अतिसंवेदनशील असताना नगरपालिका प्रशासनाच्यावतीने येथे एकही सार्वजनिक नळ दिलेला नाही. कुठल्याच दुकानात आपात्कालिन अग्निशमन यंत्र नसल्याचे या घटनमुळे उघडकीस आले आहे. घटनास्थळावर उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, तहसीलदार मनोज लोणारकर, ठाणेदार किरण वानखडे, सहकारी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह नगरपालिकेचे पदाधिकारी पोहोचले. (तालुका प्रतिनिधी)