शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

अपूर्ण रायगड प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 22:53 IST

तालुक्यात दमदार पाऊस झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्या पावसाच्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या  शेतजमिनी खरडून गेल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचे सर्वेक्षण केव्हा होणार, असा प्रश्न तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला आहे.

ठळक मुद्देखरडून गेलेल्या शेताचे सर्वेक्षण केव्हा ?: पळसखेडच्या शेतकऱ्यांचा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : तालुक्यात दमदार पाऊस झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्या पावसाच्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या  शेतजमिनी खरडून गेल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचे सर्वेक्षण केव्हा होणार, असा प्रश्न तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला आहे. पळसखेड येथील अपूर्ण स्थितीत असलेल्या रायगड प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या आठवड्यात सोमवार व मंगळवारी तालुक्यात धुंवाधार पाऊस झाला. काही भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली. यामध्ये घुईखेड, मोगराजवळील खोलाड व चंद्रभागा नदी व गावातील नाल्यांना पूर आल्याने घुईखेड, येरड, मोगरा, कवठा कडू, पळसखेड, राजुरा, एकपाळा, दिघी कोल्हे, सावंगी संगम शिवारातील शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांनी कशीबशी पेरणी केली. आणि पेरणी नंतर पीकही चांगले उगवले. मात्र उगवलेले शेतातील  सोयाबीन, तुर, कपाशीचे पीक पुर आल्याने खरडून गेल्याने शेतात काहीच राहिले नाही. काही शेताला तर तलावाचे स्वारूप पाहायला मिळाले. त्यामुळे एकरी हजारो रुपये खर्च केलेले पीक वाया जाण्याच्या मार्गावर असताना प्रशासनाकडून अजून पर्यंत नुकसानीचे सर्वेक्षण केले नसल्याने सर्वेक्षण करून शासनाने मदत घ्यावी अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करत आहे.चांदूर रेल्वे तालुक्यात पळसखेड येथे रायगड प्रलकपाच्या कामाला चार वर्षांआधी सुरुवात झाली. पण, अद्याप प्रकल्प अपूर्णावस्थेत आहे. कधी शासनाकडे पैसा नसतो, तर कधी या प्रकल्पाचे कंत्राटदार बदलतात. यामुळे या प्रकल्पाचे काम रेंगाळत चालले आहे. वारंवार कंत्राटदार बदलत चालल्याने त्या कामाच्या प्रतवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. काम सुरू झाल्यानंतर धरणाची भिंत बांधण्याचे काम सुरू झाले व राईगुई नदीच्या दोन्ही बाजूने एक किलोमीटरपर्यंत मोठमोठ्या भिंती उभारल्या. दरवर्षी या नदीला चांगले पाणी असते. महापूरही येतात. मात्र, आता या नदीच्या दोन्ही कडेला भिंत बांधल्याने जमा झालेले पाणी एकाच मार्गाने वाहत असल्याने पाण्याच्या प्रवाहाने भिंतीलगतच्या शेती व समोरील गावातील शेती खरडून जात आहे. दोन वर्षांपासून चांगली जमीन या पुरामुळे पडीक राहत अल्याचे सावंगी संगम, एकपाळा या गावातील शेतकऱ्यांची ओरड आहे.रायगड प्रकल्प बंद असल्सामुळे जमीन खरडलीरायगड प्रकल्प बंद पडल्यामुळे धरणातील साचलेले पाणी एकाच ठिकावरून वाहत असल्याने जमीन खरडून गेली व पिकांचे प्रचंड नुकसान झाले. पुराच्या पाण्याने नदीचे बांध फुटले. ते बांध जर वेळेत बांधले नाही तर आणखी नुकसान होईल, अशी प्रतिक्रिया एकपाळा येथील शेतकरी वासुदेव काळमेघ यांनी दिली.कृषी विभागाकडून बांधलेले बंधारे निकृष्ट दर्जाचेकृषी विभागाकडून जे बंधारे बांधण्यात आले, ते निकृष्ट दर्जाचे होते. त्याची मी कृषी विभागाकडे तक्रारसुद्धा केली होती. पण, त्याची दखल कुणीही घेतली नाही. तेच बंधारे फुटले आणि तेथून शेतात पाणी शिरल्याने आमचे सोयाबीन पीक पूर्णत: पाण्याखाली आले, अशी प्रतिक्रिया एकपाळा येथील शेतकरी दिनेश जवळकर यांनी दिली.