शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

वीज गळतीच्या नावाखाली ग्राहकांची लूट

By admin | Updated: July 23, 2016 00:40 IST

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराला वीज ग्राहक त्रासले आहेत. वीज गळतीच्या नावावर ग्राहकांची आर्थिक लूट सुरू आहे.

महावितरणचे दुर्लक्ष : वीज चोरीचा भुर्दंड सामान्य ग्राहकांच्या माथी सुनील देशपांडे अचलपूर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराला वीज ग्राहक त्रासले आहेत. वीज गळतीच्या नावावर ग्राहकांची आर्थिक लूट सुरू आहे. प्रामाणिक ग्राहकांना त्याची झळ मोठ्या प्रमाणात बसत असल्याचे जनतेचे म्हणणे आहे. वितरण कंपनीच्या काही अधिकाऱ्यांमुळे अचलपूर-परतवाड्यासह तालुक्यातील बहुतांशी गावात वीज चोरी होत असते. ज्या ज्या वेळी भरारी पथकाने वीज चोरांविरुद्ध मोहीम राबविली, त्यावेळी वीज चोरांकडून कोट्यवधी रुपयांची वसुली करण्यात आली असल्यामुळे ही वीज चोरी काही स्थानिक कर्मचाऱ्यांच्या आशिर्वादाशिवाय होऊ शकत नाही हे स्पष्ट आहे. वीज चोरी हे वीज गळतीचे मुख्य कारण असल्याचे कंपनीचे काही अधिकारी ग्राहक वर्गास सांगत असतात. प्राप्त होणाऱ्या एकूण विजेपैकी १५ टक्के वीज गळती (टॉलरन्स) मान्य करण्यात आली आहे. १५ टक्केपर्यंत वीज गळती असल्यास त्याचा अधिभार ग्राहकांवर लावता येत नाही. परंतु सद्यस्थितीत गळतीचे प्रमाण ३० ते ४० टक्के असून गळतीची रक्कम नियमितपणे वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांकडून पठाणी पद्धतीने वसूल केले जात आहे. अचलपूर-परतवाड्यासह तालुक्यातील काही ग्राहकांकडे अजूनही जुने मीटर आहेत, तर काही ग्राहकांनी संबंधित कर्मचाऱ्यांना हाताशी धरून अ‍ॅटजेस्टमेंट केली जात आहे. प्राप्त माहितीनुसार काही ग्राहकांना विजेचे मीटर दिलेले असून त्यांचा नियमित वापर सुरू असला तरी तो रेकॉर्डवर नाही. अशा ग्राहकांचा भुर्दंड नियमित देयके भरणाऱ्या ग्राहकांकडून कंपनी वसूल करीत आहेत. कालांतराने रेकॉर्डवर आल्यानंतर त्या वीज ग्राहकांकडून सुद्धा वीज गळतीपोटी वीज वापरापोटीची रक्कम दंडासह वसूल केल्या जाते. एकाच कारणासाठी तब्बल दोनदा वीज वितरण कंपनी पैसे वसूल करीत आहे. या सर्व बाबी संतापजनक असून ग्राहकांची खुलेआम लूट असल्याचा आरोप जनतेतून होत आहे. आयोगाच्या सुनावणीत मुद्दा चर्चेला वीज गळतीच्या नावावर वितरण कंपनी ग्राहकांच्या लुटीचा मुद्दा २०१२ पासून लावून धरला आहे. तेव्हा कार्यकारी अभियंत्यांना लेखी निवेदन दिले होते. कारवाई न झाल्याने आंदोलनही केले होते. मागील वर्षी महावितरण वीज नियामक आयोगाकडे लेखी तक्रार देऊन सुनावणीमध्ये माहितीही दिली होती. दि. ११-७-२०१६ रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोगाच्या सुनावणीत हा मुद्दा जोरकसपणे मांडला होता. वीज चोरी हे अधिभार हेच मुख्य कारण आहे, असे रयत संघटनेचे अध्यक्ष राहूल कडू यांनी सांगितले. जुळ्या शहरासह तालुक्यात कित्येक ठिकाणी तारावर आकोडे टाकून वीज चोरी केली जाते. अधिभाराच्या नावाखाली शेतकऱ्याला त्याचा आर्थिक भुर्दंड बसतो. काही शेतातील विहिरीत पाणी नसल्याने ५ ते ६ वर्षांपासून बंद आहे. त्यांना अजूनही बिले येतात. शेवटी शेतकरीच नागवला जातो. इंधन समायोजन आकार हाही एकप्रकारचा अधिभारच आहे. - सोमेश ठाकरे (अध्यक्ष) मागच्या आठवड्यात चार ठिकाणी वीज चोरी होत असल्याची माहिती मिळाली. आमचे पथक गेले पण एकाच ठिकाणची वीज चोरी सापडली. सद्या वीज गळतीचा अधिभार लावला जात नाही. अचलपूर तालुक्यात वीज चोरीचे प्रमाण नसल्यासारखे आहे. - जे. एच. वाघमारे, उपकार्यकारी अभियंता