शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पांढऱ्या सोन्याची लूट; व्यापाऱ्याचा फंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 23:11 IST

यंदाच्या हंगामात बीटीवर गुलाबी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कपाशीची बोंडे किडली. त्यामुळे पावसाची प्रतवारी खराब झाली. याचा फायदा व्यापाऱ्यांद्वारा घेण्यात येऊन बेभाव खरेदी करण्यात येत आहे. ते कापूस बोनसच्या लाभासाठी गुरातमध्ये पाठविला जात आहे.

ठळक मुद्देबेभाव खरेदी; गुजरातमध्ये विक्री : प्रतवारी खराब दर्शवून उठविला फायदा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या हंगामात बीटीवर गुलाबी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कपाशीची बोंडे किडली. त्यामुळे पावसाची प्रतवारी खराब झाली. याचा फायदा व्यापाऱ्यांद्वारा घेण्यात येऊन बेभाव खरेदी करण्यात येत आहे. ते कापूस बोनसच्या लाभासाठी गुरातमध्ये पाठविला जात आहे.यंदा अपुऱ्या पावसामुळे कपाशीवर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होऊन ‘लाल्या’ची विकृती आली आहे. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने बोंडन्बोंड किडली. त्यामुळे कापसाची प्रतवारी खराब झाली. परतीच्या पावसानेदेखील कापूस झाडावर ओला झाल्याने प्रतवारी खराब झाल्यामुळे पणनसह सीसीआयच्या केंद्रांवरदेखील या कापसाला नाकारण्यात येते. खासगी व्यापाºयांकडे या कापसाची दुय्यम दराने खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यंदा बीटीच्या बीजी-२ वाणाला बोंड अळीने ग्रासल्यामुळे कापसाची गुणवत्ता कमी होऊन धाग्याच्या लांबीवर परिणाम होत आहे. तसेच बोंडातील सरकी अळीने खाल्ल्यामुळे कापसाचे वजनदेखील कमी होत आहे. अळीच्या विष्टेमुळे कापसाच्या रंगावरही परिणाम होत आहे. आदी घटकांमुळे कापसाची गुणवत्ता खराब झालेली आहे. त्याचा थेट परिणाम कापसाच्या दरावर झालेला आहे. मात्र त्याचवेळी व्यापारी शेतकºयांकडून खरेदी केलेला कापूस बोनससाठी गुुजरात राज्यात विकला जात आहे.गुजरातमध्ये हमीभाव व ५०० रुपये बोनसजिल्ह्यातील कापसाची गुणवत्ता खराब झाली असली तरी व्यापाऱ्यांद्वारा दुय्यम दर्जाचे दराने कापसाची खरेदी करून गुजरातमध्ये पाठविला जात आहे. गुजरातमध्ये चार हजार ३१० रूपये हमीभाव व प्रतिक्विंटल ५०० रूपये बोनस दिला जात असल्याने व्यापाºयांना चार हजार ८०० रूपये भाव मिळत आहे. तेथील सरकार कमी प्रतवारीचा कापूस हमीभावाने खरेदी करून बोनसही देत आहे.शासनाची एक हजार, व्यापाऱ्यांची ५३ हजार क्विंटल खरेदीसध्या पणन महासंघाद्वारा हमीभावाने २९ क्विंटल, सीसीआयची १२९५ क्विंटल तर व्यापाऱ्यांद्वारा ५२ हजार ४०९ क्विंटल खरेदी करण्यात आली. शासनाचूी धामणगाव व अंजनगाव सुर्जी येथेच तर व्यापाºयांची सर्वच तालुक्यात खरेदी केलेली आहे. सरासरी ४३०० ते ४५०० रूपये प्रति क्विंटल दराने ही खरेदी करण्यात आली. तर बुधवारी ५,०१८ क्विंटल खरेदी करण्यात आली.

टॅग्स :cottonकापूस