शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

'देखना भाई, सीपी साहब भेस बदलकर आयेंगे!'

By admin | Updated: June 23, 2014 23:37 IST

शहर पोलीस दलात आज सर्वत्र एकच वाक्य ऐकू येत होते. 'देखना भाई, सीपी साहब भेस बदलकर आयेंगे'. आपापले कर्तव्य चोखपणे बजावण्याचा ज्याचा त्याचा प्रयत्न होता. पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला

पोलीस दल 'टाईट' : अधिकारी श्रेणीतील पहिली विकेटगणेश देशमुख - अमरावतीशहर पोलीस दलात आज सर्वत्र एकच वाक्य ऐकू येत होते. 'देखना भाई, सीपी साहब भेस बदलकर आयेंगे'. आपापले कर्तव्य चोखपणे बजावण्याचा ज्याचा त्याचा प्रयत्न होता. पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला अचानक कोणत्याही वेशात दाखल होऊ शकतात. कर्तव्यात कसूर दिसला तर लागलीच निलंबनाची कारवाई होऊ शकते, हे भय प्रत्येकच पोलीस अधिकाऱ्याच्या मनात आज दिसले. अधिकाऱ्यांच्या कर्तव्यनिष्ठने त्यामुळे कमालीची उंची गाठलेली जाणवली. चोरांनी, घरफोड्यांनी अमरावतीकरांचे जगणे कठीण केल्यावरही सहज वागणाऱ्या पोलिसांना 'लोकमत'ने 'दहशत चोरांची' या वृत्तमालिकेतून खडबडून जागे केले. 'सीपी साहेब एक करा, वेशांतर करून शहरात फिरा', वृत्तमालिकेतील या एका भागातून सीपींनी स्वत: बाहेर फिरणे कसे आवश्यक आहे, हा मुद्दा 'लोकमत'ने लोकदरबारात मांडला होता. सुरुवातीला वेगळे प्रयत्न करून गुन्हे रोखण्याचा आटोकाट प्रयत्न करणाऱ्या पोलीस आयुक्तांनी नंतर या वृत्तमालिकेची संवेदनशीलपणे दखल घेतली. आतापर्यंत केबिनमधून कारभार चालविणारे सुरेशकुमार मेकला म्हणूनच अचानक केबिनमधून बाहेर पडले.शिस्त अशीच कायम असावीसाध्या वेशात बेमालूमपणे ते शहरात फिरले. पोलीस ठाणी, पोलीस चौक्या आणि शहरातील काही महत्त्वाच्या ठिकाणांचे त्यांनी बारकाईने निरीक्षण केले. पोलीस आयुक्त शहरात फिरताहेत ही बाब जराही 'लिक' होणार नाही, याची पुरेपूर खबरदारी मेकला यांनी घेतली. सीपी नेमके कुठेकुठे गेलेत, याची अचूक महिती पोलीस दलात अजूनही कुणाचकडे नाही. पूर्वी पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेतून शहरातील कायदा व सुव्यवस्था बघणाऱ्या पोलीस आयुक्तांनी ज्यावेळी स्वत:च्या नजरेतून शहर बघितले, त्यावेळी ते अवाक् राहिले. बाहेर सर्वच आलबेल असल्याचे सांगणारे अधिकारी त्यांची कर्तव्ये कशी निभावतात, याचा अनुभव आयुक्तांनी स्वत: घेतला. कर्तव्य बजावण्याऐवजी झाडाखाली सावलीत विश्रांती घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची पहिली विकेट त्यांनी तत्काळ घेतली. राजापेठ पोलीस ठाण्याचा हा अधिकारी नाकाबंदीदरम्यान सावलीत वेळ मारून नेत होता. चोरी, घरफोडीच्या घटनांनी पोलिसांना मान वर करणेही कठीण झालेले असताना, सर्वाधिक घरफोड्या होणाऱ्या राजापेठच्या अधिकाऱ्याने कर्तव्याप्रती अशी आस्था ठेवावी, हे पोलीस आयुक्तांना जराही रूचले नाही. तत्क्षण निलंबनाची कारवाई त्यांनी केली. लोकभावनेला फारकत देऊन आतापर्यंत अधिकाऱ्यांना पाठिशी घालणारे सीपी अधिकाऱ्यांच्या कर्तव्यनिष्ठेबाबत आता सतर्क झाले आहेत. जे-जे कामचुकारपणा करतील, त्या सर्वांना शासन होईलच, असा स्पष्ट संकेतच पोलीस आयुक्तांनी या कठोर कारवाईतून दिला. आयुक्तांना आता अख्खे शहर त्यांच्या नजरेतून बघायचे आहे. पोलीस ठाण्यांमध्ये काय चालते ते हेरायचे आहे. गस्त कोण कशी करतात, याचा हिशेब ठेवायचा आहे. का वचकत नाहीत चोर पोलिसांना, याच्या मुळाशीच त्यांना शिरायचे आहे. आयुक्तांचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. 'जाँबाज' पोलीस अधिकाऱ्यांची पाठ थोपटायलाच हवी, कर्तबगार पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार व्हायलाच हवा; परंतु जे बेजबाबदार आहेत, त्यांनाही शासन झालेच पाहिजे, ही लोकभावना आहे. पोलीस आयुक्तांच्या बदललेल्या प्रशासनपद्धतीतून ती प्रतिबिंबित होऊ लागली आहे. पोलीस आयुक्तांनी मारलेल्या साध्या वेशातील, साध्या वाहनातील फेरफटक्यामुळे अख्खे पोलीस दल कमालीचे सतर्क झाले आहे. ज्याला त्याला आता आपापल्या हद्दीत गुन्हे न होण्याची, कर्तव्य चोखपणे बजावण्याचीच चिंता आहे. अधिकाऱ्यांच्या मुखातील 'सीपी कुछ नही करते यार' हे पूर्वीच्या वाक्याची जागा आता 'ड्युटी करो, वरना सीपी साहब नोकरी छिन लेंगे' या वाक्याने घेतली आहे. पोलीस दलाचा प्रभाव शिस्तीशिवाय पडत नाही. पोलीस आयुक्तांनी निर्माण केलेली ही शिस्त आता कायम राखण्याची गरज आहे. सीपींचे हे गोपनीय दौरे आणि पोलीस अधिकाऱ्यांवर निर्माण झालेला हा वचक अमरावतीच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहे. शिस्तीसोबत त्यामुळे कर्तव्यनिष्ठा वाढेल. रिझल्टही येतील. या त्रिसूत्रींवर चालणारा कारभार शहरवासीयांना खात्रीलायक सुरक्षा प्रदान करू शकेल.