लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : सर्वत्र कोरोना व्हायरस धुमाकूळ सुरू आहे. नागरिक कमालीचे दहशतीखाली आहेत. संचारबंदीमुळ रस्त्यावर कुणीही नाही. अशा स्थितीत बुधवारी पहाटे २ वाजून१० मिनिटाने एका धिप्पाड अस्वलाने शहरातील मुगलाई, टिंबर डेपो रोड, सिंधी कॅम्प मार्गावर लाँग मार्च केला. काही वेळानंतर याच मार्गाने परतही गेले. ही सर्व क्रिया एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. बुधवारी दिवसभर शहरात कोरोना व्हायरसप्रमाणेच या अस्वलाची दहशत होती.परतवाडा शहराला लागूनच मेळघाटचा परिसर आहे. बेलखेडा परिसरात अनेकांची शेती आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोहफुलांची झाडे आहे. ही मोहफुले अस्वलाचे सर्वात आवडीचे खाद्य असून, ते खाण्यासाठी अस्वल हमखास झाडाखाली दिसते. परंतु, बुधवारी पहाटे २.१० वाजता अस्वलाने टिंबर डेपो रोडने धाव घेतली. अस्वल शहरात आल्याचे वृत्त पसरल्याने नागरिकांमध्ये कमालीची दहशत व्याप्त आहे.बेलखेडा परिसरातून एका अस्वलाने शहराचा फेरफटका मारला. परंतु, काही वेळानंतर ते परत जंगलात निघून गेल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.- प्रदीप भड, वनपरिक्षेत्र अधिकारी, परतवाडावनविभागाचे सर्च ऑपरेशनपरतवाडा शहरात अस्वल आल्याची माहिती वनविभागाला मिळताच त्यांनी अस्वलाचे पगमार्क आणि सीसीटीव्हीमधील फुटेज तपासून संपूर्ण परिसर पिंजून काढला. दरम्यान, रात्री २,२८ वाजता शहरातील गोपालनगर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेºयात ती कैद झाली. बिच्छन नदी पार करून सर्कीट हाऊस रोडवर तो पोहोचला. त्या परिसरातील केळीच्या बागेकडे तो गेल्याचे गोपालनगरमधील सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट होते. नागरिकांनी याची माहिती वनविभागाला दिली. आहे.
अस्वलाचा परतवाड्यात ‘लाँग मार्च’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 05:00 IST
परतवाडा शहराला लागूनच मेळघाटचा परिसर आहे. बेलखेडा परिसरात अनेकांची शेती आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोहफुलांची झाडे आहे. ही मोहफुले अस्वलाचे सर्वात आवडीचे खाद्य असून, ते खाण्यासाठी अस्वल हमखास झाडाखाली दिसते. परंतु, बुधवारी पहाटे २.१० वाजता अस्वलाने टिंबर डेपो रोडने धाव घेतली. अस्वल शहरात आल्याचे वृत्त पसरल्याने नागरिकांमध्ये कमालीची दहशत व्याप्त आहे.
अस्वलाचा परतवाड्यात ‘लाँग मार्च’
ठळक मुद्देसीसीटीव्हीत कैद : नागरिकांमध्ये दहशत, वनविभाग मागावर, गोपालनगरकडे वळविला मोर्चा