लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी/वनोजा बाग : रहिमापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरी कुबेरी (ता. दर्यापूर) येथील १४ वर्षीय मुलाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे एकाकी झालेली त्याच्या आईचा शेवटचा आधारदेखील हिरावला गेला आहे. दरम्यान, गावात २५ वर्षांनंतर रक्तरंजित पहाट उगवली. त्यापूर्वी १९८४ पर्यंत चार खून झाले होते. या खूनप्रकरणांचा उलगडा झालेला नाही.मंगेश गजानन रूमकर (१४) याचा मृतदेह उमरी शिवारात बुधवारी सकाळी ७ च्या सुमारास आढळून आला. मृतदेहाच्या अवस्थेवरून त्याची अनेक तासांपूर्वी हत्या करण्यात आल्याचा अंदाज उपविभागीय पोलीस अधिकारी सोमय मुंडे, ठाणेदार शेख जमील व उपस्थित पोलीस ताफ्याने व्यक्त केला. मृतदेहापासून काही अंतरावर लाल रंगाचे कटर आणि चप्पल आढळल्या. दरम्यान, मृत मंगेशचा मामा लोहारकामानिमित्त वडनेर गंगाई येथे दोन वर्षांपासून स्थायिक झाला होता. लोहार समाजातील या कुटुंबाचे गावात कुणाशीही वाकडे नव्हते आणि परिस्थितीला शरण गेल्याने तसेदेखील कुणाशी वैर परवडणारे नव्हते. अशा स्थितीत त्याचा खून व्हावा, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहेत.दरम्यान, मिरवणुकीत झेंडे उंचावत दंग असलेला मंगेश मोबाइल आणण्यासाठी घराकडे निघाला होता. यादरम्यान त्याचा घातपात झाला, अशी चर्चादेखील गावात रंगली आहे. पोलिसांनी काही जणांची चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.संगीता रुग्णालयातमंगेशच्या मृत्यूची बातमी कळताच र तिची शुद्ध हरपली. ग्रामस्थांनी तिला तातडीने गावातील खासगी रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू आहेत.श्वान पथक अपयशीअमरावती येथून उमरी शिवारातील बबलू दुबे यांच्या शेतात पाचारण केलेल्या श्वान पथकाला मंगेशच्या मारेकऱ्याचा माग काढण्यात अपयश आले. घटनाक्रम १२ तासांच्या आत घडलेला असेल, तरच श्वान पथकाकडून माग काढला जाऊ शकतो, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.मारेकऱ्याशी झाली झटापट?न्यायवैद्यक चमूलाही येथे पाचारण करण्यात आले होते. मृतदेहाच्या शेजारी उकरलेल्या मातीवरून मंगेशने प्रतिकारस्वरूपात झटापट केल्याचा अंदाज चमूने व्यक्त केला असून, ही माती परीक्षणासाठी सोबत नेली आहे.गावात स्मशानशांततामंगेशच्या हत्येची वार्ता कळताच उमरी कुबेरी येथे स्मशानशांततेचे वातावरण पसरले आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत त्याने चढाओढीने सहभाग घेतला होता.जागीच शवविच्छेदनमंगेशचा मृतदेह कुजलेला असल्याने जागीच शवविच्छेदन करून सायंकाळी ग्रामस्थांच्या उपस्थितीत मृतदेहावर अंत्यसंस्कार पार पडले. घटनास्थळाला जिल्हा पोलीस उपअधीक्षक एम.एम. मकानदार व स्थानिक गुन्हे शाखेचे सदानंद मानकर, किरण वानखडे यांनीही भेट दिली.
एकाकी सुनीताचा आधार हिरावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 22:27 IST
रहिमापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरी कुबेरी (ता. दर्यापूर) येथील १४ वर्षीय मुलाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे एकाकी झालेली त्याच्या आईचा शेवटचा आधारदेखील हिरावला गेला आहे. दरम्यान, गावात २५ वर्षांनंतर रक्तरंजित पहाट उगवली. त्यापूर्वी १९८४ पर्यंत चार खून झाले होते. या खूनप्रकरणांचा उलगडा झालेला नाही.
एकाकी सुनीताचा आधार हिरावला
ठळक मुद्दे२५ वर्षांनंतर उमरीत रक्तरंजित पहाट : १९८४ पूर्वी झाले चार खून, प्रकरण संशयास्पद