शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Lok Sabha Election 2019; आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 01:07 IST

लोकशाहीच्या महोत्सवात गुरूवारी मतदान होणार असल्याने दोन हजार मतदान केंद्रांसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय पोलिंग पार्ट्या बुधवारी दुपारपर्यंत संबंधित केंद्रांवर रवाना झाल्यात. गुरूवारी सकाळी सहा वाजता ‘मॉकपोल’ घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे२४ उमेदवार रिंगणात : दोन हजार केंदे्र; १८, ३०,५६१ मतदार बजावणार कर्तव्य

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकशाहीच्या महोत्सवात गुरूवारी मतदान होणार असल्याने दोन हजार मतदान केंद्रांसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय पोलिंग पार्ट्या बुधवारी दुपारपर्यंत संबंधित केंद्रांवर रवाना झाल्यात. गुरूवारी सकाळी सहा वाजता ‘मॉकपोल’ घेण्यात येणार आहे. त्यानंतर सात वाजतापासून सायंकाळी सहापर्यंत मतदान होईल. दर दोन तासांनी मतदानाची टक्केवारी जाहीर केली जाईल. २४ उमेदवारांसह नोटासाठी झालेल्या या मतदानाची मोजणी २३ मे रोजी होणार आहे.अमरावती लोकसभा मतदारसंघात सुरुवातीला एक हजार ९२६ मतदान केंद्र होती. यामध्ये ७४ सहाय्यकारी केंद्रांची भर पडल्यानंतर एकूण दोन हजार मतदान केंद्र झालेली आहेत. यापैकी २७ केंद्रांच्या नावात बदल झाला, तर ३८ केंद्रांचे ठिकाणात बदल झालेला आहे. जिल्हा निवडणूक विभागाद्वारा मतदारसंघनिहाय मतदान साहित्य ‘एआरओ’ना वितरित करण्यात आले होते. बुधवारी सकाळी संबंधित कार्यालयाद्वारा मतदार साहित्याचे वाटप पोलिंग पार्ट्यांना करण्यात आले. मेळघाटातील १३४ दुर्गम भागांतील मतदान केंद्रांवर मंगळवारी पोलिंग पार्ट्या पोहोचल्या आहेत. मतदानाच्या टक्केवारीसाठी या केंद्रांवर रनर राहणार आहेत. अन्य ठिकाणी मोबाईल नेटवर्कची सुविधा असल्याने मतदानाची टक्केवारी जलद मिळण्यास मदत होणार आहे. मतदारसंघात ९ लाख ४३ हजार ४४४ पुरुष, ८ लाख ८७ हजार ०८० स्त्री व ३७ इतर मतदार आहेत. यामध्ये ५ हजार १७९ दिव्यांगांचा समावेश आहे. यात ६६७ दृष्टिबाधित, मूदबधिर ४३१, अस्थिव्यंग व इतर व्यंग १६३२ मतदारांचा समावेश आहे. या मतदारांसाठी विशेष सुविधा आहेत. शहरी भागात ६१७, तर ग्रामीण भागात १३८३ व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध आहे. यावेळी प्रथमच १९ सखी मतदान केंद्र स्थापन केले आहेत. या ठिकाणी सर्व अधिकारी, कर्मचारी हे महिलाच राहतील.१९९ मतदान केंद्रांवर वेब कास्टिंगएकूण मतदान केंद्राच्या १० टक्के केंद्रावर यंदा वेब कास्टिंगद्वारे मतदान प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण राहणार आहे. हे प्रक्षेपण एआरओ, डीडीआरओ, आरओ, सीईओ मुंबई व दिल्ली येथील आयोगाच्या कार्यालयात दिसणार आहे व या पाचही ठिकाणावरून यावर नियंत्रण ठेवल्या जाणार आहे. ही सुविधा यावेळी प्रथमच आहे.पावसासाठी ताडपत्री, उन्हासाठी हिरवी नेटजिल्ह्यात मंगळवारी सार्वत्रिक पाऊस झाला. यामुळे मतदानाच्या टक्केवारीत बाधा निर्माण होऊ शकते. याविषयीचे वृत्त 'लोकमत'द्वारा जनदरबारात मांडण्यात आले असता जिल्हा प्रशासनाने याची दखल घेतली. मतदान साहित्यासाठी वॉटरप्रुफ कापड तसेच पावसापासून बचाव व्हावा, यासाठी आवश्यक त्या ठिकाणी ताडपत्री लावण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. उन्हापासून बचाव व्हावा, यासाठी आयोगाच्या स्तरावर यापूर्वीच सूचना देण्यात आल्या.१९ केंदे्र हे सखी,आदर्श मतदान केंद्रप्रथमच १९ सखी मतदान केंद्राची संकल्पना साकारली आहे. यामध्ये अमरावती मतदारसंघात लाठेबाई विद्यालय, शिव इंग्लिश स्कूल, सेंट थॉमस, गर्ल्स हायस्कूल, तिवसा येथील दोन जि.प. शाळा, बनोसा येथील नगरपरिषद उर्दू शाळा, अंजनगावला नगरपरिषद शाळा, धारणी येथे बॉईज स्कूल, कांडली येथील आदर्श विद्यालय, परतवाड्याला नगर परिषदेची सिंधी शाळा व जिजामाता प्राथमिक स्कूल केंद्रात महिला अधिकारी व कर्मचारी राहतील.तीन मुख्य, ७८ सूक्ष्म आॅब्झर्व्हर१ या निवडणुकीसाठी दिनेशकुमार हे मुख्य आॅब्झर्व्हर आहेत. निवडणूक खर्चासाठी बसंत घडीयाल व कायदा व सुव्यवस्थेसाठी कुलदिपसींग सियाल आॅब्झर्व्हर आहेत. याव्यतिरिक्त ७८ मायक्रो आॅब्झर्व्हर यांचा ‘वॉच’ राहणार आहे.२ आब्झर्व्हर सहीत २० हजार ६२३ मनुष्यबळ लागणार आहे. यामध्ये ८९१६ पोलिंग स्टॉफ, ६२६५, इतर ४६८४ पोलीस दलाचे अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश आहे.३ ८५,५२५ बॅलेट पेपर लागणार आहे. यामध्ये २१००० पोस्टल बॅलेट, २५३० सर्र्व्हिस व्होटरसाठी, २९९५ बॅलेट युनिटसाटी, ४५००० टेंडर बॅलेट पेपर, ८००० डमी बॅलेट पेपर व ६००० ब्रॉली बॅलेट पेपर लागणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकamravati-pcअमरावतीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019