शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Lok Sabha Election 2019; दिव्यांग मतदारांचा मतदानाला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 00:59 IST

लोकसभा मतदारसंघात समाविष्ट सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये पाच हजार १७९ दिव्यांग मतदार आहेत. यावेळी आयोगाद्वारा विशेष सुविधा पुरविण्यात आल्यामुळे दिव्यांग मतदारांचा टक्का यावेळी लक्षणीय वाढला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत २४ उमेदवार होते.

ठळक मुद्देलोकसभा निवडणूक : आयोगाद्वारे यावेळेस विशेष सुविधा, पीडब्ल्यूडी अ‍ॅपची निर्मिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकसभा मतदारसंघात समाविष्ट सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये पाच हजार १७९ दिव्यांग मतदार आहेत. यावेळी आयोगाद्वारा विशेष सुविधा पुरविण्यात आल्यामुळे दिव्यांग मतदारांचा टक्का यावेळी लक्षणीय वाढला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत २४ उमेदवार होते. सहा विधानसभा मतदार संघात दोन हजार मतदान केंद्रे असून, १८ लाख १२ हजार २४ मतदार आहेत. यामध्ये दिव्यांग मतदारांची संख्या ५ हजार १८९ एवढी आहे. या सर्व मतदारांसाठी निवडणूक विभागाने त्यांना घरापासून ते मतदान केंद्रापर्यत नेण्या-आणण्याची व्यवस्था केली होती. सर्व मतदान केंद्रांवर व्हीलचेअरची व्यवस्था केली असल्याने अनेक दिव्यांग मतदारांना मोठा दिलासा मिळाला. विशेष म्हणजे, त्यांच्या मदतीसाठी ग्रामरोगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. त्यांची याकरिता चांगली मदत मिळाली. त्यामुळे दिव्यांग मतदारांचा मतदानासाठीचा कल यावेळी वाढला. ‘स्वीप’ उपक्रमांतर्गत मतदार जनजागृतीसाठी लोकसभा मतदारसंघात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल, सीईओ तथा स्वीपच्या नोडल अधिकारी मनीषा खत्री, दिव्यांग सेलचे नोडल अधिकारी तथा समाज कल्याण विभागाचे सहायक उपायुक्त सुनील वारे तसेच महापालिकेचे आयुक्त संजय निपाणे व त्यांचे सहकारी चमूने केलेल्या प्रयत्नामुळे दिव्यांग मतदारांचा मतदानाला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे.विशेष म्हणजे, महापालिका क्षेत्रात आॅटोरिक्षाचालक संघटनेलाही मोफत सुविधा देण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले होते. या सुविधांमुळे दिव्यांग मतदारांची टक्केवारी समाधानकारक राहणार आहे.कुणाच्याही मदतीविना दृष्टिबाधितांचे मतदानलोकसभा निवडणुकीत अमरावती विधानसभा मतदारसंघात गुरुवारी भिवापूरकर अंध विद्यालयाच्या मतदान केंद्रावर दोन दृष्टिबाधितांनी कुणाच्याही मदतीविना मतदानाचा हक्क बजाविल्याचे दिव्यांग सेलचे नोडल अधिकारी तथा समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त सुनील वारे यांनी दिली. अजीज परसुवाले आणि पवन उके असे या दोन दृष्टिबाधित मतदारांचे नाव आहेत. त्यांच्या कारनाम्याने सर्व जण चकित झाले.मतदार संघनिहाय मतदारसंख्याजिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात एकृण ६ हजार ३४७ दिव्यांग मतदार आहेत. यामध्ये धामणगाव रेल्वे मतदारसंघातील ६१० आणि मोर्शी मतदारसंघातील ४४८ असे १५८ दिव्यांग मतदार हे वर्धा लोकसभा मतदार संघात येतात. उर्वरित बडनेरा मतदारसंघात ७४९, अमरावती ५८८, तिवसा १०५०, दर्यापूर १८५१, मेळघाट ३७९, अचलपूर ५७२ अशा सहा मतदारसंघात ५१८९ दिव्यांग मतदार हे अमरावती लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकamravati-pcअमरावतीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019