शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; इंया वोटो होय अनमोल, डामान बन डाऊ डीजा मोल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 10:39 IST

‘हां आ, इंज वोटिंग डायबाका, या वोटो होय अनमोल, डामान बन डाऊ डीजा मोल, टुनिकाबी लालीचोन बकी हेजे बनहिगरा टे वोटिंग डाये’!

ठळक मुद्देमेळघाटात मतदार जागृतीकोरकू भाषेतील झळकले पोस्टर

नरेंद्र जावरे ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ‘हां आ, इंज वोटिंग डायबाका, या वोटो होय अनमोल, डामान बन डाऊ डीजा मोल, टुनिकाबी लालीचोन बकी हेजे बनहिगरा टे वोटिंग डाये’!‘कुठल्याच प्रकारच्या प्रलोभनाला बळी न पडता निर्भयतेने मतदान करा. आपले मत अमूल्य आहे. पैशात त्याची तुलना करू नका. तुम्ही मतदान करा आणि इतरांनाही मतदान करायला लावा. आपले मत आपली ताकद आहे. मतदार लहान असो वा मोठा, सर्वांनी मतदान करा’ असा त्याचा अर्थ. कोरकू भाषेत मतदान जनजागृती करणारे फलक मेळघाटच्या गावखेड्यांसह पंचायत समिती आणि इतर कार्यालयांपुढे लावण्यात आले आहेत.मेळघाटच्या पाड्यांमध्ये कोरकू भाषेतून पथनाट्य सादर करून, फलक, शाळांमधून विद्यार्थ्यांच्या हस्ते पालकांसाठी पत्र पाठवून मतदान करण्याचे आवाहन होत आहे. प्रत्येकाने मतदान करावे, त्याद्वारे मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी निवडणूक आयोगाच्या दिशानिर्देशानुसार मेळघाटात कोरकू भाषेतील हे अभिनव फलक लक्षवेधक ठरले आहेत. मेळघाट विधानसभा मतदारसंघात २ लाख ७२ हजार १२३ मतदार आहेत. शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. या कल्पकतेचा मतदारांवर किती प्रभाव पडतो, हे निवडणुकीला स्पष्ट होईल.

कोरकूत पत्रजिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत जिल्हाभर सुरू असलेला मतदार जनजागृती कार्यक्रम मंदिर, मशिदीत करण्यात येत असतानाच अमरावती शहरातील शाळांच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसाठी कोरकू भाषेतूनच मतदान करण्याचे पत्र पाठविण्यात आले आहे.

जिल्हाभर मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. मेळघाटात कोरकू भाषेत आदिवासींमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.- मनीषा खत्री, सीईओ तथा नोडल आॅफिसर, स्वीप

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकamravati-pcअमरावतीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019