शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; अजब-गजब! ती माझी बायको नव्हेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 13:09 IST

लोकसभा निवडणुकीसाठी अमरावती शहरातील एका महिलेने भरलेल्या उमेदवारी अर्जामुळे अजब-गजब प्रकार पुढे आला आहे.

ठळक मुद्देनिवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार पती म्हणून नाव वापरल्याचा सोमेश्वर करवाडेंचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकसभा निवडणुकीसाठी एका महिलेने भरलेल्या उमेदवारी अर्जामुळे अजब-गजब प्रकार पुढे आला आहे. त्या महिलेने मीनाक्षी सोमेश्वर करवाडे नावाचे मतदार कार्ड वापरले. तथापि, सोमेश्वर रामकृष्ण करवाडे यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे ‘ती माझी पत्नी नव्हे’ असा आक्षेप तक्रारीतून नोंदविला आहे.तक्रारकर्ते सोमेश्वर रामकृष्ण करवाडे हे अमरावती शहरातील वडाळी येथे राहतात. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव अमरावती लोकसभा मतदारसंघातून मीनाक्षी सोमेश्वर करवाडे नामक महिलेने उमेदवारी अर्ज भरला. त्या अर्जावर पती म्हणून सोमेश्वर करवाडे यांचे नाव आहे. मात्र, ती माझी बायको नाही. माझा तिच्याशी कोणताही संबंध नाही. तिने दाखल केलेल्या अर्जात बनावट दस्तावेजांचा वापर करून माझ्या नावाचा दुरुपयोग केला आहे. त्यामुळे तिच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार सोमेश्वर करवाडे यांनी शुक्रवारी सायंकाळी ६.२६ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांना केली आहे. यासंबंधाने त्यांनी त्यांचे अधिकृत इलेक्शन कार्ड व कुटुंबातील सदस्यांची नावे असलेले रेशन कार्डची प्रत तक्रारीसोबत जोडलेली आहे. सोमेश्वर करवाडे यांच्या तक्रारीवर निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.नाव कमी करण्यासाठी तहसीलदारांना पत्रतीन वर्षांपूर्वी सोमेश्वर करवाडे यांनी मीनाक्षी सोमेश्वर करवाडे यांच्या नावातील सोमेश्वर नाव कमी करण्यासंबंधी पत्र तहसीलदारांना पत्र दिले होते. आता तिने पती म्हणून आपले नाव वापरून इलेक्शन कार्ड बनविल्याचे सोमेश्वर करवाडे यांच्या निदर्शनास आले.महिलेचे नाव मीनाक्षी भीमराव निरगुळे?सोमेश्वर करवाडे यांच्या तक्रारीनुसार, उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या महिलेचे नाव मीनाक्षी भीमराव निरगुळे आहे. हे खात्रीपूर्वक माहिती असल्याचे सोमेश्वर करवाडे तक्रारीत म्हणत आहे. भीमराव निरगुळेंशी त्या महिलेची फारकत झालेली नाही. तिने माझ्याविरुद्ध फ्रेजरपुरा पोलिसांत खोट्या तक्रारी केल्या होत्या. परंतु, प्रकरण अंगलट येईल, असे लक्षात येताच तक्रारी परत घेतल्याचे सोमेश्वर करवाडे यांनी तक्रारीत म्हटले आहे.सोमेश्वर करवाडे यांच्या तक्रारीचे आम्ही समर्पक उत्तर देऊ. सदर महिलेने शपथपत्र लिहून दिले आहे. संबंधित व्यक्तीने न्यायालयात दाद मागावी.- शरद पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक