शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; हक्काचा मेळघाटच ठेवणार मतांपासून वंचित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 01:16 IST

मेळघाट हा आदिवासीबहुल प्रांत नवनीत राणा यांचे शक्तिस्थळ मानले जाते. राणा दाम्पत्याने नऊ वर्षे त्या प्रांतात केलेली भावनिक गुंतवणुकीचे धागे उसवणे इतर कुणाही उमेदवारांना जमले नाही; तथापि राणा यांचे टीव्ही हे चिन्ह बदलल्यानंतरची मेळघाटातील ताजी स्थिती अत्यंत विपरीत झाली आहे.

ठळक मुद्देनवनीत राणांचा मार्ग खडतर : चिन्ह बदलानंतरची ताजी स्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मेळघाट हा आदिवासीबहुल प्रांत नवनीत राणा यांचे शक्तिस्थळ मानले जाते. राणा दाम्पत्याने नऊ वर्षे त्या प्रांतात केलेली भावनिक गुंतवणुकीचे धागे उसवणे इतर कुणाही उमेदवारांना जमले नाही; तथापि राणा यांचे टीव्ही हे चिन्ह बदलल्यानंतरची मेळघाटातील ताजी स्थिती अत्यंत विपरीत झाली आहे. नवनीत यांचा जवळचा मेळघाटच त्यांना मतांपासून वंचित ठेवणार असल्याचा अंदाज विश्लेषकांचा आहे.राणा दाम्पत्याने मेळघाटात टीव्ही या चिन्हाचा जबरदस्त प्रचार केलेला आहे. आदिवासींना नवनीत राणा अर्थात् टीव्ही असेच समीकरण ठाऊक आहे. धारणी आणि चिखलदरा तालुक्यांतील आदिवासी मतदार शिक्षणापासून वंचित आहेत. लिहिता वाचता येत नसल्यामुळे त्यांना उमेदवारांची नावे वाचता येत नाहीत. प्रसिद्धी माध्यमांतून केलेल्या जाहिरातींचाही त्यामुळे आदिवासी प्रांतातील मतदारांवर प्रभाव पडणार नाही. औरस-चौरस पसरलेल्या मेळघाटात सर्व आदिवासींपर्यंत पोहोचणे आणि बदललेले बोधचिन्ह त्यांच्या स्मृतीत कायम करणे, राजकीय जाणकारांच्या मते अशक्यप्राय बाब आहे. नवनीत राणा यांना मते देऊ इच्छिणाऱ्या आदिवासी मंडळींचीही मते त्यामुळे नवनीत यांना मिळणार नाहीत. सर्वाधिक श्रम केलेल्या आणि सर्वाधिक अपेक्षा असलेल्या प्रांतातून मतप्राप्तीचा हा घसरणारा टक्का इतर कुठल्याही भागातून भरून निघणारा नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक